तिकीट तपासनीसाला मारहाण करणार्याच्या विरोधात गुन्हा नोंद !
मुंबई – पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलमध्ये तिकीट तपासनीसाला प्रवाशाने मारहाण केली होती. त्यांचा शर्ट फाटून त्यांच्याकडील दंडाचे दीड सहस्र रुपयेही गहाळ झाले होते. मारहाण करणार्या प्रवाशाने नंतर माफीनामा लिहून आणि हरवलेले पैसे परत करून प्रकरण मिटवले; पण बोरिवली रेल्वे पोलिसांनी प्रवासी अनिकेत भोसले यांच्या विरोधात या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.
गांजा विक्री करणार्या दोघांना अटक !
डोंबिवली – येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या साहिल बोराडे आणि प्रकाश जाधव यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
संपादकीय भूमिका : समाजाला व्यसनाधीन बनवणार्यांना कठोर शिक्षा करायला हवी !
कळवा येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग !
ठाणे – येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या आवारातील उद्यानात ११ वर्षांच्या दिव्यांग मुलीचा विनयभंग करणार्या प्रदीप शेळके (वय ४२ वर्षे) या नराधमाला कळवा पोलिसांनी अटक केली आहे. एका रुग्णाच्या नातेवाईकाच्या आणि रुग्णालयातील सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे पीडित मुलीवरील अनर्थ टळला.
संपादकीय भूमिका : लेकीबाळींवर प्रतिदिन होणारे लैंगिक अत्याचार छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला लज्जास्पद ! अशांवर कठोर कारवाई झाल्यास असे प्रकार थांबतील !
मुंबईत १३ पोलिसांच्या घरात चोरी !
मुंबई – चोरांनी मुंबई पोलीस अधिकार्यांच्या माहीम येथे असणार्या पोलीस वसाहतीतील १३ पोलिसांच्या घरात चोरी केली. त्यांनी घरातून रोकड आणि मौल्यवान वस्तू, तसेच देवाच्या चांदीच्या मूर्तीही चोरल्या. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रात्रपाळीवरील पोलीस कर्मचारी, सुट्टीनिमित्त गावी गेलेल्या पोलिसांची, तसेच निवृत्त पोलिसांच्या घरांमध्ये चोरी झाली.
संपादकीय भूमिका : पोलिसांच्याच घरात चोर्या होत असतील, तेथे सामान्यांच्या घरांच्या सुरक्षेचे दायित्व कोण घेणार ?