नागपूर – बांगलादेशामधील अराजकतेमुळे येथील संत्र उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. तिथे निर्यात होणारा २.५० लाख टन संत्र्यांचे काय करायचे ? असा प्रश्न संत्रा उत्पादक शेतकर्यांपुढे निर्माण झाला आहे. आंबिया आणि मृग बहार मिळून संत्रा उत्पादन ७ ते ८ लाख टन आहे. त्यापैकी २.५० लाख टन बांगलादेशाला जात होते, तसेच बांगलादेशाने आयात कर वाढवल्याने २५ ते ३० सहस्र टन संत्री निर्यात होत आहेत.
‘संत्र उत्पादकांना शासनाने साहाय्य करणे आवश्यक आहे. निर्यात न करताही संत्र्यांसाठी देशांतर्गत बाजारपेठ उपलब्ध आहे. सरकारने वाहतुकीचा प्रश्न सोडवल्यास संत्र उत्पादकांना मोठा दिलासा मिळेल’, असे महाऑरेंजचे कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे यांनी सांगितले.