Meerut Stone Pelting : नमाजपठणात त्रास होत असल्याचे सांगत मशिदीजवळ हिंदूंच्या मिरवणुकीवर मुसलमानांची दगडफेक

मेरठ (उत्तरप्रदेश) येथील घटना !

मेरठ (उत्तरप्रदेश) – वीर राणी अवंतीबाई लोधी यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात येणार्‍या मिरवणुकीवर मशिदीजवळ मुसलमानांनी दगडफेक करून हिंदूंना मारहाण केल्याने येथे तणाव निर्माण झाला. मिरवणुकीत वाजवण्यात येणार्‍या ‘डीजे’मुळे (मोठ्या संगीत यंत्रणेमुळे) नमाजपठणाला त्रास होत असल्याने तो बंद करण्याच्या मुसलमानांच्या मागणीवरून झालेल्या वादातून ही घटना घडली.

१. शिवशक्तीनगर येथील दुर्जन सिंह लोधी मंदिरापासून मिरवणुकीला प्रारंभ झाला. रात्री १० वाजण्याच्या सुमारास खैरनगर येथील हौज वाली मशिदीजवळ ही मिरवणूक पोचल्यावर मुसलमानांनी डीजेमुळे नमाजपठण करणार्‍यांना त्रास होत असल्याचे सांगत डीजेे बंद करण्याची मागणी केली.

२. त्याच वेळी मिरवणुकीतील स्पीकर एका मुसलमान मुलावर पडल्याचाही त्यांनी आरोप केला. त्यानंतर त्यांनी मिरवणुकीत सहभागी झालेल्यांवर दगडफेक केली. यानंतर दुसर्‍या पक्षाकडूनही दगडफेक करण्यात आली. त्याच वेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

३. मिरवणुकीच्या आयोजन समितीचे सदस्य प्रवीण लोधी यांनी सांगितले की, त्यांच्या मिरवणुकीत समाविष्ट स्पीकर पडलाच नव्हता. संबंधित मुलाला आणखी कशाने तरी दुखापत झाली.

४. मिरवणुकीवर आक्रमण करणार्‍यांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी भाजपने केली आहे. येथे वर्ष २००६ पासून मिरवणूक काढली जात आहे.

संपादकीय भूमिका

देशात मशिदीजवळ हिंदूंच्या मिरवणुकांवर दगडफेक होते आणि ती कोणतेही सरकार रोखत नाही, हे त्यांना निवडून देणार्‍या हिंदूंना लज्जास्पद !