Bihar Gangrape Murder Case : सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणातील आरोपीचे घर पोलिसांनी बुलडोझरद्वारे पाडले !

प्रशासानाने बलात्कार्‍याचे घर बुलडोझरद्वारे पाडून टाकले

मुझफ्फरपूर (बिहार) – उत्तरप्रदेशमध्ये ज्याप्रकारे गेल्या काही वर्षांपासून लव्ह जिहादी अथवा अन्य गुन्हेगार यांची बेकायदशीर घरे बुलडोझरद्वारे पाडण्यात येत आहेत, तशीच कारवाई आता बिहार राज्यातील प्रशासनाने केल्याचे समोर आले आहे. राज्यातील मुझफ्फरपूरमध्ये एका १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केल्यावरून पोलीस प्रशासानाने संजय राय या बलात्कार्‍याचे घर बुलडोझरद्वारे पाडून टाकले आहे.

१. ७ दिवसांपूर्वी ५ जणांनी एका अल्पवयीन मुलीला बंदुकीच्या धाक दाखवून तिच्या घरातून उचलून नेले होते. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केली. घटनेच्या दुसर्‍या दिवशी पीडितेचा मृतदेह नग्नावस्थेत सापडला होता.

२. मुख्य आरोपी संजय राय याच्यासह ५ आरोपी पसार असून गेल्या ७ दिवसांत पोलिसांना कुणालाही अटक करता आलेली नाही. (ही आहे पोलिसांची कार्यक्षमता ! अशांना जनतेच्या पैशांतून का म्हणून पोसायचे ? संपादक)

३. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस अधिकारी कुमार चंदन यांनी संजय याच्या घरावर विज्ञापन चिकटवून त्या माध्यमातून ‘जर १७ ऑगस्टच्या दुपारी १२ वाजेपर्यंत आरोपींनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली नाही, तर मालमत्ता जप्त केली जाईल’, असे जाहीर केले होते. त्यानंतर पोलिसांनी संजय राय याचे घर बुलडोझरद्वारे पाडले.

संपादकीय भूमिका

उत्तरप्रदेशमध्ये अशी कारवाई करूनही तेथे असे प्रकार थांबलेले नाहीत. त्यामुळे आता बलात्कार्‍यांना फासावर लटकवण्याचाच कायदा झाला पाहिजे ! ‘कायदा सुव्यवस्था हा राज्याचा प्रश्‍न आहे’, असे म्हणण्यापेक्षा आता केंद्र सरकारनेच यासाठी राष्ट्रव्यापी कायदा करणे आवश्यक आहे, असेच संतप्त जनतेला वाटते !