जादूटोणा केल्याची तक्रार केल्यावरून धर्मांध मुसलमानाची वृद्ध हिंदु महिलेला धमकी आणि प्राणघातक आक्रमण
बरेली (उत्तरप्रदेश) – बरेली जिल्ह्याच्या सिरौली शहरात किराणा दुकान चालवणार्या अंकित गुप्ता यांच्या वृद्ध आईला शेजारी रहाणार्या अली महंमद याने केलेल्या आक्रमणात ती गंभीररित्या घायाळ झाली. ‘बरेली सोडून जा अन्यथा बांगलादेश आणि पाकिस्तान यांसारखी परिस्थिती निर्माण होईल’, अशी धमकीही अली महंमद याने या वेळी दिली. पोलिसांनी अली महंमद याला अटक केली आहे.
अंकित यांची वृद्ध आई मीना गुप्ता यांनी अली महंमद याच्या विरोधात जादूटोणा आणि तंत्र-मंत्र करण्यावरून पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती; मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई करण्याऐवजी दोन्ही पक्षांना समजावले. या तक्रारीमुळे संतापलेल्या अली महंमदने मीना गुप्ता यांच्यावर आक्रमण करत त्यांचा जबडा तोडला. अली याने लोखंडी सळीने हे आक्रमण केले. यात मीना गुप्ता यांचे दात तुटले. ज्या वेळी अली महंमदने मीना गुप्ता यांच्यावर आक्रमण केले, तेव्हा परिसरातील इतर लोकही तेथे उपस्थित होते; परंतु त्यांना कुणीही साहाय्य केले नाही.
संपादकीय भूमिका
|