बांगलादेशात मुसलमानांचे आंदोलन
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील काही बांगलादेशी मुसलमानांनी भारतद्वेषी मोर्चा काढल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यामध्ये मोर्चेकरी अत्यंत त्वेषाने ‘आम्हाला देहली नको, ढाका पाहिजे’, ‘भारतासमवेत सर्व व्यापार बंद झाला पाहिजे’, ‘बांगलादेशातून भारताला पुसून टाकू’, अशा भारतद्वेषी घोषणा देत असल्याचे दिसत आहे. बांगलादेशातील हिंदुत्वनिष्ठांनी हा व्हिडिओ ‘सनातन प्रभात’ला पाठवला. ‘सनातन प्रभात’च्या ‘एक्स’ खात्यावर तो प्रसारित केला असता एका हिंदूने लिहिले, ‘लक्षात ठेवा, असे केले, तर भारतात एकही बांगलादेशी घुसखोर शेष रहाणार नाही.’
#Bangladesh: These bigots are denouncing #Hindu India in such a chauvinist manner!
They are saying,
1. We want #Dhaka, not #Delhi.
2. Trade with #India should be abolished.
3. Let us wipe out #Bharat.Needless to say, what is synonymous with Bharat in Bangladesh?… pic.twitter.com/x18J14Hsdp
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 13, 2024
संपादकीय भूमिकामुसलमानांसाठी भारत म्हणजे हिंदूच ! त्यामुळे बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंना मिळालेली ही उघड धमकीच आहे ! आता अशा धर्मांध मुसलमानांच्या विरोधात तेथील हिंदूंनी स्वरक्षणार्थ सिद्ध झाले पाहिजे ! |