मिरज येथे श्री दासबोध अभ्यास मंडळाच्या वतीने ‘सामूहिक श्री हनुमान उपासने’चे आयोजन !

मिरज, ७ ऑगस्ट (वार्ता.) – येथील ‘श्री दासबोध अभ्यास मंडळा’च्या वतीने श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड यांच्या मार्गदर्शनानुसार सांगली आणि सातारा यांसह अनेक ठिकाणच्या विविध मारुति मंदिरांमध्ये ‘श्री हनुमान सामूहिक उपासना’ आयोजित करण्यात येत आहे. श्रावण मासातील प्रत्येक शनिवारी सांगली जिल्ह्यातील देशिंग, खरशिंग, विश्रामबाग, गावभाग, तसेच सातारा जिल्ह्यातील चाफळ आणि उंब्रज येथे सामूहिक श्री हनुमान उपासनेचे आयोजन करण्यात आले आहे. या सामूहिक उपासनेत सर्व हनुमानभक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड यांच्या वतीने पू. योगेशबुवा रामदासी, पू. गुरुनाथ कोटणीस महाराज, श्री. श्याम साखरे, श्री. आनंदराव बोधे, सौ. ज्योती कोरबू यांनी केले आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांसह अन्य अनेक राज्यांत आणि परदेशांतही ‘श्री हनुमान सामूहिक उपासना’ आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती अध्यक्ष श्री. श्याम साखरे यांनी श्री दासबोध अभ्यास मंडळाच्या वतीने दिली.