कीर्तनाचा लाभ घेण्याचे आवाहन !
मिरज, ७ ऑगस्ट (वार्ता.) – येथील श्री संत वेणास्वामी मठाचा वर्धापन उत्सव ५ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. काकड आरती, महापूजा, कीर्तन, उपासना तथा पिठस्थ देवतांच्या दर्शनाचा लाभ सर्व भक्तांनी अवश्य घ्यावा, असे आवाहन मठाधिपती पू. कौस्तुभबुवा रामदासी यांनी केले आहे.
या उत्सवात विविध ठिकाणांहून येणारे समर्थभक्त आणि कीर्तनकार सौ. प्रितीताई कुलकर्णी, श्री. शोभित कुरळे, कु. शिवानी कुरळे, सौ. सुवर्णाताई कुरळे, श्री. धनंजय बुवा दीक्षित, कु. सायली देवधर, सौ. जोत्स्नाताई निरंतर, सौ. अनघाताई पटवर्धन यांची सुश्राव्य कीर्तने आयोजित करण्यात आली आहेत. मठात दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत कीर्तन होणार आहे.