चीनशी संघर्ष टाळण्यासाठी अमेरिकेने योग्य धोरण ठरवण्याची आवश्यकता

प्रतीकात्मक छायाचित्र

१. चीनचा निश्चय आणि त्यामध्ये झालेली वाढ

बिग्रेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

आपण केलेल्या दाव्यांचा प्रतिकार करण्यासाठी चीनने सिद्धता दाखवली असून फिलिपाईन्स आणि भारत यांच्या सीमारेषेवर चीनकडून आणला जाणारा वाढता दबाव यावरून ते दिसून येत आहे. चीन साम्यवादी पक्षाच्या राजकीय वैधतेशी आणि वर्ष २०४९ पर्यंत चीनचा कायापालट घडवण्याच्या स्वप्नाशी संबंधित बीजिंगकडून कृती होत आहे. वर्ष १८०० पासून चीनकडून विविध प्रदेशांविषयीचे दावे केले जात असून राष्ट्र वाचवण्यासाठी ते महत्त्वाचे आहेत, यादृष्टीने चीनकडून त्याकडे पाहिले जात आहे.

२. अमेरिकेच्या सध्याच्या धोरणातील त्रुटी

चीनकडून मोठ्या प्रमाणात प्रादेशिक वादामध्ये सहभाग वाढत असतांना चीनशी संघर्ष करणे टाळणे आणि त्याच्या बळाची भीती यांवर अवलंबून रहाण्याचे अमेरिकेचे धोरण अगदीच उत्तरदायित्व नसलेले आहे. त्यामुळे फिलिपाईन्स आणि जपान यांच्या चीनसह असलेल्या वादामध्ये त्या दोन्ही देशांचे रक्षण करण्याच्या अमेरिकेच्या दाव्याला काही विश्वासार्हता रहात नाही. हा संघर्ष झाला, तर तो अमेरिकेला कमकुवत किंवा नष्ट करू शकतो. त्यामुळे हे टाळण्यासाठी अमेरिकेने काहीतरी चलाखीचे धोरण अवलंबले पाहिजे.

३. अमेरिकेने तैवानविषयी धोरणात्मक दृष्टीकोन ठेवणे आवश्यक !

तैवानला दिलेल्या ६ आश्वासनांमध्ये सुधारणा करून आणि त्याचे रक्षण करण्याच्या सिद्धतेसाठी त्याला शस्त्रांची विक्री करणे, अशा प्रकारे संघर्षाच्या उंबरठ्याच्या खाली राहून अमेरिका तैवानशी असलेले कायदेशीर बंधन पाळू शकते. हा प्रश्न सोडवण्यासाठी अमेरिकेने राजनैतिक प्रयत्नांना प्राधान्य दिले पाहिजे.

४. अमेरिकेने पूर्व आणि दक्षिण चीनच्या समुद्रातील वाद हाताळावा

चीनचे पूर्व आणि दक्षिण भागांतील देशांशी वाद आहेत. त्यामध्ये चीनने आपापसांतील संरक्षण करार स्पष्ट करून मनीला आणि जपान या देशांना त्यांचे बीजिंगशी असलेले वाद त्यांनीच हाताळावेत, यासाठी अमेरिकेने प्रोत्साहन द्यायला हवे. या भागातील तणाव न्यून करण्यासाठी अमेरिका दक्षिण चीन समुद्रातील एकमेकांच्या संमतीने ठरवलेल्या आचारसंहितेला पाठिंबा देऊ शकते.

५. चीन-भारत वादात अमेरिकेने सहभाग टाळावा !

अमेरिकेला चीन-भारत सीमारेषेवरील वादाविषयी काही रस नसल्याने उलट त्यात पडल्यास त्याची हानी होऊ शकते, असा विचार करून त्यामध्ये सहभागी होणे टाळावे. अमेरिकेच्या राष्ट्रहिताचे संरक्षण करणे आणि राष्ट्राची शक्ती राखून राष्ट्र वाचवण्यासाठी अमेरिकेने चलाखीचे धोरण ठेवणे महत्त्वाचे आहे.

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.