सुपौल (बिहार) – येथील त्रिवेणीगंज भागात असलेल्या सेंट जॉन बोर्डिंग शाळेमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेत मोठ्या शिशूवर्गातील मुलाने (वय ७ वर्षे) इयत्ता तिसरीत शिकणार्या मुलावर (वय १२ वर्षे) गोळी झाडली. पिस्तूल वाकल्याने १२ वर्षीय मुलाच्या डाव्या तळव्याला गोळी लागली. त्याच्यावर उपचार चालू असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
Nursery student brings a gun to school; shoots a student of the third standard !
📍 Supaul, Bihar
👉 Such incidents showcase the extent to which our society is morally degraded, isn’t it ?
Image Credit : @Bhaaratsamvad #CrimeWatch pic.twitter.com/HcHlDzDdeE
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 1, 2024
आसिफ असे इयत्ता तिसरीत शिकणार्या मुलाचे नाव असून ३१ जुलैच्या सकाळी नमाजपठण झाल्यानंतर तो वर्गात परतला. त्यानंतर ७ वर्षीय मुलाने वर्गात येऊन आसिफवर गोळी झाडली. या घटनेमुळे प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थी, तसेच पालक यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
संपादकीय भूमिकाएवढ्या लहान मुलाच्या हातात पिस्तुल येतेच कशी ? यातून बिहारमधील कायदा-सुव्यस्थेची कल्पना करता येईल ! |