अंधश्रद्धा निर्मूलनासाठी राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात होणार कक्षाची स्थापना !

मुंबई – राज्यात अस्तित्वात असलेल्या ‘महाराष्ट्र नरबळी आणि अन्य अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोणा कायदा’ याच्या अंतर्गत राज्यातील सर्व पोलीस ठाण्यात कक्ष स्थापन करण्याचा अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.

राज्याच्या गृहविभागाने हा निर्णय घेतला. राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा आणि सुव्यवस्था) डॉ. छेरिंग दोरजे यांनी नुकतेच याविषयीचे विभागीय परिपत्रक काढले आहे.

या कक्षांवर पोलीस आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात साहाय्यक आयुक्त (गुन्हे), तर पोलीस अधीक्षकांच्या कार्यक्षेत्रात पोलीस निरीक्षक (स्थानिक गुन्हे शाखा) यांची दक्षता अधिकारी म्हणून   नियुक्ती केली जाणार आहे. गृहविभागाने राज्यातील सर्व पोलीस अधीक्षक आणि विशेष पोलीस महानिरीक्षक यांना याविषयी कार्यवाही करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका 

‘लव्ह जिहाद’ आणि ‘हिंदूंचे धर्मांतर’ रोखण्यासाठी काय कृती करणार ?, हेही गृहविभागाने स्पष्ट करावे !