ठाणे – ठाण्यातील चितळसर या भागात दिलशाद याने पत्नीच्या पहिल्या पतीपासून असलेल्या ४ वर्षांच्या मुलाची छळ करून हत्या केली आहे. या अल्पवयीन मुलाच्या आईने पहिल्या पतीसमवेत घटस्फोट घेत आरोपीसमवेत लग्न केले होते. लग्नानंतर पत्नी तिच्या पहिल्या मुलाला कोलकात्याहून ठाण्याला घेऊन आली. त्याने मुलाचे दायित्व घेण्यास नकार दिला. त्यानंतर त्याने त्या मुलाला छळ करून मारले. शवविच्छेदन अहवालात मुलाचे शारीरिक शोषण झाल्याचे समोर आले. मुलाच्या बरगड्या आणि हाडे अनेक ठिकाणी तुटली, तसेच त्याच्या पोटाच्या आत जखमा झाल्या. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.