|
पुणे – उरण (रायगड) येथील २२ वर्षीय यशश्री शिंदे हिची दाऊद शेख याने अत्यंत विकृत आणि निर्घृणपणे हत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर त्याला फाशी देण्याची मागणी विश्व हिंदु परिषद पश्चिम महाराष्ट्राचे गोरक्षा प्रमुख ऋषि भागवत यांनी केली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? पोलीस आणि प्रशासन यांनीच कृती केली पाहिजे. – संपादक) ऋषि भागवत या वेळी म्हणाले की, हिंदु समाज आता आक्रमक झाला आहे. प्रशासनाने आरोपी दाऊद शेख याच्यावर कठोर कारवाई करून त्याला फाशी दिली नाही, तर आम्ही भर चौकात त्याला फाशी देऊ. प्रशासनाला कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा नसेल, तर आरोपी दाऊद शेखला फाशी द्या. उरण पोलिसांनी आरोपीचा शोध चालू केला असून तो बेंगळुरू येथे पळून गेल्याची माहिती आहे.