साडेतीन वर्षांनंतर खटल्याचा निकाल !
ठाणे – येथे शेजारी राहणार्या ५ वर्षीय मुलीवर ७५ वर्षे वयाच्या मौनुद्दीन अजिजुल्ला अन्सारी याने बलात्कार केला. त्याने तिला दूरचित्रवाणी पहाण्याच्या निमित्ताने घरात बोलावले होते. ही घटना भिवंडी येथे वर्ष २०२१ मध्ये घडली. या प्रकरणी भिवंडी जिल्हा सत्र न्यायालयाच्या विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश एन्. के. कारंडे यांनी दोषी नराधमाला अंतिम सुनावणीत ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि ५ सहस्र रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
१० नोव्हेंबर २०२१ या दिवशी आरोपीला अटक झाली होती. त्याच्यावर विशेष पोक्सो न्यायालयात दोषारोपपत्र प्रविष्ट करून शिक्षेसाठीची सुनावणी साडेतीन वर्षे चालू होती.
संपादकीय भूमिकाअशांची विकृत मनोवृत्तीच्या लोकांना जाणा आणि आपल्या लेकीबाळींना त्यांच्यापासून दूर ठेवा ! |