मध्यप्रदेशात १४ मुसलमानांनी स्वीकारला हिंदु धर्म !

जून महिन्यात ३०, तर एप्रिल महिन्यात ८ मुसलमानही बनले होते हिंदु !

मुसलमान स्वेच्छेने हिंदु धर्मात परतले

इंदूर (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशातील इंदूर जिल्ह्यात असलेल्या खजराना मंदिरात १४ मुसलमान स्वेच्छेने हिंदु धर्मात परतले आहेत. मंदिरात विधीपूर्वक संपूर्ण कार्यक्रम पार पडला. त्यांनी हिंदु धर्माचा स्वीकार केल्यानंतर आनंद व्यक्त केला. शाझिया हाश्मीपासून सपना बनलेल्या मुलीने पत्रकारांसमोर बोलतांना सांगितले की, ती कुणाच्याही दबावाविना हिंदु धर्म स्वीकारत आहे. हिंदु धर्म फार आवडतो; म्हणून तिने हा निर्णय घेतला. आलिया नावाच्या दुसर्‍या एका मुलीनेही हिंदु धर्मामध्ये आल्याविषयी आनंद व्यक्त केला.

हा कार्यक्रम विश्‍व हिंदु परिषदेचे नेते संतोष कुमार शर्मा यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता. जून महिन्यात खजराना मंदिरात ३० मुसलमानांनी, तर एप्रिल महिन्यात ८ मुसलमानांनी हिंदु धर्म स्वीकारला होता, अशी माहिती शर्मा यांनी दिली. हिंदु धर्म स्वीकारणार्‍या या लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना सांगितले की, ते मुसलमान समाजातील विविध प्रकारच्या दुष्कृत्यांमुळे त्रस्त होते.