Gadchiroli Naxalites Killed : गडचिरोलीत चकमक; १२ नक्षलवादी ठार

गडचिरोली – १२ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिसांना यश मिळाले आहे. गडचिरोली पोलीस आणि माओवादी यांच्या चकमकीत १२ जहाल नक्षलवादी ठार झाले. २८ जुलै ते ३ ऑगस्ट या काळात ‘नक्षल सप्ताह’ असतो. या पार्श्वभूमीवर विध्वंसक कारवाया करण्याचा नक्षलवाद्यांचा प्रयत्न गडचिरोली पोलिसांनी हाणून पाडला. महाराष्ट्र शासनाने या नक्षलवाद्यांवर एकत्रितपणे एकूण ८६ लाख रुपयांचे पारितोषिक घोषित केले होते.

उत्तर गडचिरोली नक्षलवादापासून मुक्त झाल्याचा दावा !

येथे नक्षलवाद्यांची २ दले कार्यरत होती. या चकमकीत सर्व नक्षलवादी ठार झाले. येथे एकही सशस्त्र नक्षलवादी शिल्लक नाही, अशी माहिती देण्यात येत आहे. उत्तर गडचिरोली पूर्ण नक्षलवादमुक्त झाल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे. ‘सी ६०’ पथकाच्या जवानांचे सर्वत्र कौतुक होत आहे.