लक्ष्मणपुरी – राज्यातील शाहजहांपूर येथे ५० वर्षीय इसरार याने १२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. पीडित मुलगी हिंदु असून ती अनुसूचित जातीतील आहे. हे घृणास्पद कृत्य केल्यानंतर इसरार पळून गेला होता; मात्र पोलिसांनी त्याला शोधून अटक केली. त्याच्याविरुद्ध पॉक्सो, एस्.सी-एस्.टी कायदा आणि इतर कलमे यांच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
१. हे प्रकरण शहरातील सदर बाजार भागातील आहे. इसरार उपाख्य गुड्डू याने १२ वर्षीय मुलीला शेजारच्या दुकानात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर त्याने मुलीला सोडून दिले.
२. या वेळी सामान घेऊन घराच्या दिशेने येत असलेल्या मुलीच्या वडिलांना ती रडतांना दिसल्याने त्यांनी तिची विचारपूस केल्यावर मुलीने घटनाक्रम सांगितला.
३. मुलीच्या वडिलांनी इसरार याला जाब विचारल्यावर त्याने वडिलांना धमकी दिली.
४. या प्रकरणाची माहिती मिळताच हिंदु संघटनांशी संबंधित लोकही तेथे पोहोचले आणि त्यांच्या साहाय्याने पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार नोंदवली.
सैतानाने पछाडल्याचा इसरार याचा बनावपोलिसांनी इसरार याची चौकशी केली तेव्हा त्याने सांगितले, ‘माझ्यात सैतान आहे. मला सैतानाने पछाडले आहे’, असे सांगितले. (असे ‘सैतान’ हिंदु मुलींनाच लक्ष्य कसे काय करतात ? स्वतःचे कुकृत्य लपवण्यासाठी ‘सैतान’ किंवा ‘मनोरुग्ण’ असल्याचा बनाव करणार्यांना हिंदू ओळखून आहेत ! – संपादक) |
संपादकीय भूमिकाअशांना भर चौकात फाशी देण्याची मागणी कुणी केली, तर त्यात चूक ते काय ? |