मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश
चेन्नई (तमिळनाडू) – मुसलमान पोलीस कर्मचारी कामावर असतांना दाढी ठेवू शकतात, असा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, वर्ष १९५७ च्या मद्रास पोलीस राजपत्रानुसार तमिळनाडूमधील मुसलमान पोलिसांना कर्तव्यावर असतांनाही दाढी ठेवण्याची अनुमती आहे.
न्यायालयाने म्हटले की, भारत हा विविध धर्म आणि चालीरीती यांचे पालन करणार्यांचा देश आहे. या भूमीचे सौंदर्य आणि वेगळेपण नागरिकांची श्रद्धा अन् संस्कृती यांच्या विविधतेमध्ये आहे. तमिळनाडू सरकारच्या पोलीस विभागाला कठोर शिस्त आवश्यक आहे; परंतु विभागातील शिस्त राखण्याचे कर्तव्य उत्तरदायींना अल्पसंख्याक समुदायातील कर्मचार्यांना, विशेषत: मुसलमानांना दाढी ठेवल्यामुळे शिक्षा करण्याची अनुमती देत नाही.
वर्ष २०१८ मध्ये १ मास सुटी घेऊन मक्केला जाऊन आल्यानंतर एका पोलीस कर्मचार्याला दाढी ठेवल्याने त्याला शिक्षा झाली होती.
संपादकीय भूमिकाआता हिंदु पोलीस कर्मचार्यांनीही कामावर असतांना कपाळावर टिळा लावण्यासारख्या धार्मिक परंपरांचे पालन करावे, असे कुणी म्हटल्यास आश्चर्य वाटू नये ! |