उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. नंदिनी पवार ही या पिढीतील एक आहे !
(‘वर्ष २०२४ मध्ये कु. नंदिनी पवार हिची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के आहे.’ – संकलक)
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले |
१. सात्त्विकतेची ओढ
अ. ‘कु. नंदिनी घराबाहेर पडतांना, तसेच गाडीत बसल्यावर प्रत्येक वेळी आम्हाला जयघोष करण्याची आठवण करून देते.
आ. तिच्या शाळेत गाण्याच्या स्पर्धा होत्या. तेव्हा तिला इतर गाण्यांपेक्षा भक्तीगीतामध्ये अधिक रस होता.
इ. नंदिनीच्या शाळेतील एका सांस्कृतिक कार्यक्रमात एका गाण्यावर नृत्य होते. त्यात तिला भगवान महादेवाची वेशभूषा करायची होती. देवाच्या कृपेमुळे तिला ती भूमिका करण्याची संधी मिळाली. त्यामुळे ती स्वतःला फार भाग्यवान समजत होती. शिवाची वेशभूषा केल्यावर तिच्या चेहर्यावर तेज होते. त्या वेळी ‘खरोखरच भगवान शिव अवतरला आहे’, असे तिला वाटत होते.
२. इतरांना धर्माचरण करण्यास प्रवृत्त करणे
नंदिनीच्या शाळेतील काही मुली कपाळावर कुंकू किंवा टिकली लावत नाहीत. नंदिनी त्यांना कपाळावर कुंकू किंवा टिकली लावण्याचे महत्त्व सांगते आणि त्यांच्याकडून किमान टिकली लावण्याची कृती करून घेते.
३. काही अडचणी आल्यास ती आम्हाला सांगते, ‘‘प.पू. गुरुदेव आपल्या समवेत आहेत. काही काळजी करू नका. सर्वकाही ठीक होईल.’’
४. स्वभावदोष : हट्टीपणा’
– सौ. प्रीती पवार (कु. नंदिनी हिची आई), कोल्हापूर (१५.३.२०२४)
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.