कै. (श्रीमती) आदिती देवल यांच्या निधनाच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे

‘८.७.२०२४ या दिवशी रामनाथी आश्रमातील साधिका श्रीमती आदिती देवल यांचे निधन झाल्याचे वृत्त कळले. त्या वेळी त्यांच्या निधनाच्या संदर्भात मला पुढील सूत्रे जाणवली.

श्रीमती अदिती देवल

१. देवलकाकूंच्या निधनाचे वृत्त कळले, त्या वेळी मला एक पांढरा गोळा वेगाने गोलगोल फिरत असलेला दिसला. ‘तो श्रीमती अदिती देवल यांचा जीवात्मा आहे’, अशी मला जाणीव झाली.

२. देवलकाकूंच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांचा अतिशय आनंदी चेहरा माझ्या डोळ्यांसमोर आला. त्यांच्या लिंगदेहाला मुक्ती मिळाल्याचा पुष्कळ आनंद झाला असल्याचे मला जाणवले.

३. देवलकाकूंनी सर्व व्यावहारिक पाश तोडले असल्यामुळे निधनानंतर त्यांना भगवंताशी मीलनाची ओढ लागली. त्यांचा लिंगदेह आत्मिक आनंद अनुभवत होता.

४. आश्रमात येऊन निरपेक्षपणे साधना केल्याने त्यांचा लिंगदेह हलका झाला असल्याचे मला जाणवले.

५. देवलकाकूंच्या लिंगदेहाला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी जाण्याची ओढ लागली असल्याची मला जाणीव झाली.

६. त्यांनी केलेल्या निरपेक्ष साधनेमुळे त्यांना गुरुतत्त्वाचा आशीर्वाद लाभला आणि ‘त्यामुळे त्यांची ईश्वराशी एकरूप होण्यासाठी पुढील वाटचाल विनासायास होणार आहे’, असे मला वाटले.

७. ‘साधकांचे त्रास दूर व्हावेत आणि साधकांची प्रगती व्हावी’, याची त्यांना पुष्कळ तळमळ होती. त्यामुळे त्यांना गुरुतत्त्वाकडून चैतन्य प्राप्त झाले.’

– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.७.२०२४)