सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांच्याविषयी श्रीमती स्मिता नवलकर यांना आलेल्या अनुभूती

२१ जुलै २०२४ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे, त्या निमित्ताने…

‘प.पू. भक्तराज महाराज (सच्चिदानंद परब्रह्मडॉ. आठवले यांचे गुरु) आणि प.पू. रामानंद महाराज यांच्या संदर्भात मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

प.पू. भक्तराज महाराज

१. प.पू. भक्तराज महाराज यांच्याविषयी आलेल्या अनुभूती

१ अ. रस्ता ओलांडताना पडल्यामुळे हातातील साहित्य खाली पडणे आणि इतक्यात एका व्यक्तीने साधिकेला उचलून उभे करणे अन् ते प.पू. भक्तराज महाराज असल्याचे जाणवणे : मुंबईमध्ये प्रसारसेवेत असतांना मी एका कार्यालयातून बाहेर पडल्यावर रस्ता ओलांडतांना पडले आणि माझ्या हातातील साहित्य खाली पडले. इतक्यात एका व्यक्तीने मला पाठून उचलून उभे केले. तेव्हा मी त्यांना ओझरते पाहिले. त्यांनी धोतर, कोट आणि टोपी घातली होती. मी साहित्य उचलून साडी नीट करून मागे वळून पहाते, तो ती व्यक्ती तिथे नव्हती. ‘ते प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबाच) होते’, असे मला जाणवले.

१ आ. घाईघाईने रेल्वेस्थानकावरील पुलाचे जिने उतरत असतांना तोल जाऊन पडणार इतक्यात मागून कुणीतरी सावरणे आणि ‘ते प.पू. भक्तराज महाराज आहेत’, असे वाटणे : दुसर्‍या एका प्रसंगात मला मुंबईत प्रसार करून घरी परतायला पुष्कळ विलंब झाला होता. मी रेल्वेने वांद्रे येथे माझ्या रहात्या घरी निघाले असता घाईघाईने रेल्वेस्थानकावरील पुलाचे जिने उतरत होते. त्या वेळी माझा तोल जाऊन मी पडणार इतक्यात मागून कुणीतरी माझा हात पकडला आणि मला म्हटले, ‘‘बेटा, गिर जाओगे संभालो.’’ तेसुद्धा प.पू. बाबाच होते.

२. प.पू. रामानंद महाराज यांच्याविषयी आलेल्या अनुभूती

प.पू. रामानंद महाराज

२ अ. मुंबई सेवाकेंद्रात झालेल्या प.पू. रामजीदादांच्या गायनाच्या कार्यक्रमानंतर त्यांचे पाय चेपण्याची सेवा केल्यावर साधिकेच्या हाताला गुलाबाचा सुगंध येणे : वर्ष १९९९ मध्ये आम्ही रहात असलेल्या इमारतीमध्ये रहाणार्‍या श्रीमती रेबा विश्वास यांनी माझी सनातन संस्थेशी प्रथम ओळख करून दिली. एक दिवस रेबाताई आल्या आणि मला म्हणाल्या ‘‘आपल्याला सेवाकेंद्रात जायचे आहे. तिथे परम पूज्य रामजीदादा आले आहेत. तिथे भजनाचा कार्यक्रम आहे.’’ मी त्यांच्यासमवेत सेवाकेंद्रात गेले. त्या ठिकाणी भजने ऐकून माझी भावजागृती होत होती. काही वेळाने भजनाचा कार्यक्रम संपला. त्या वेळी परम पूज्य रामजीदादा पुष्कळ थकलेले वाटले. मी त्यांना म्हटले, ‘‘आपण पुष्कळ थकलेले दिसता. मी आपले चरण चेपून देऊ का ?’’  त्यांचा होकार मिळाल्यावर मी त्यांचे चरण चेपून दिले. त्यानंतर माझ्या हातांना गुलाबाचा सुगंध येत होता. मला पुष्कळ आनंद झाला आणि परम पूज्य रामजीदादांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

श्रीमती स्मिता नवलकर

२ आ. प.पू. रामानंद महाराज यांच्या जन्मशताब्दीच्या काळात ‘प.पू. रामजीदादा यांनी मुंबई सेवाकेंद्राला भेट दिली होती’, त्या वेळी काढलेले त्यांचे छायाचित्र सापडणे : १०.३.२०२४ या दिवशी प.पू. रामानंद महाराज (प.पू. रामजीदादा) यांची जन्मशताब्दी साजरी करण्यात आली. त्याची निमंत्रण पत्रिका मिळाल्यापासून ‘मला प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामजीदादा यांची भजने ऐकायला मिळतील’, याची उत्कंठा लागली होती. त्याच काळात मी माझ्या कपाटातून एक वस्तू शोधत असतांना मला प.पू. रामजीदादा यांनी मुंबई सेवाकेंद्राला भेट दिली होती, त्या वेळी काढलेले छायाचित्र सापडले. (त्यात मी त्यांच्या समोर बसले होते.) ते छायाचित्र पाहून माझी पुष्कळ भावजागृती झाली. प.पू. रामजीदादा यांच्याशी झालेल्या माझ्या पहिल्या भेटीचा प्रसंग माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला.

२ इ. परम पूज्य रामजीदादांमुळे मला मोरटक्का येथील प.पू बाबांची खोली आणि शिवलिंगाचे दर्शन घेता येणे : एकदा मी इंदूरला गेले असता इंदूर आश्रमात प.पू. रामजीदादांना भेटायला गेले. तिथे गेल्यावर त्यांनी माझी विचारपूस केली. महाप्रसाद ग्रहण केल्यावर ते म्हणाले ‘‘तुम्ही मोरटक्का आणि ज्योतिर्लिंग पाहून या.’’ मी त्यांची आज्ञा मानून तेथील एका साधिकेला घेऊन मोरटक्का आणि ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. त्या वेळी परम पूज्य रामजीदादांमुळे मला मोरटक्का येथील प.पू बाबांची खोली आणि शिवलिंगाचे दर्शन घेता आले. त्याबद्दल मी परम पूज्य रामजीदादांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.

‘परम पूज्य बाबा आणि सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव सतत माझ्यावर समवेत असतात’, याची अनुभूती त्यांनी मला दिली. त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– श्रीमती स्मिता नवलकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ७२ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (८.५.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक