उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. वै.जी. प्रणवी ही या पिढीतील एक आहे !
आषाढ शुक्ल नवमी (१५.७.२०२४) या दिवशी मंगळुरू (कर्नाटक) येथील कु. वै.जी. प्रणवी हिचा १० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले |
कु. वै.जी. प्रणवी हिला १० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
१. जन्म ते १ वर्ष
१ अ. ‘कु. प्रणवी लहान असतांना शांतपणे झोपत असे. ती कशासाठीही हट्ट करत नसे.
१ आ. पाळण्याची एक कडी तुटल्यावरही पाळण्यात झोपलेली प्रणवी देवाच्या कृपेने सुरक्षित रहाणे : प्रणवी ४ मासांची असतांना एकदा मी तिला पाळण्यात झोपवून कपडे धुण्यासाठी गेले. अर्ध्या घंट्याने मी ‘ती उठली का ?’, हे बघण्यासाठी गेले असता पाळण्याची एक कडी तुटलेली दिसली. प्रणवी पाळण्यात नव्हती. तेव्हा ती मला पाळण्याच्या बाजूला अंथरुणासह झोपलेली दिसली. त्या वेळी मला पुष्कळ आश्चर्य वाटले. देवाच्या कृपेने ती सुरक्षित होती.
२. वय १ ते २ वर्षे
अ. तिला देवाची भजने आवडत असत.
३. वय २ ते ६ वर्षे
अ. ती मला कृष्ण किंवा पार्वती यांची वेशभूषा करायला सांगत असे. शाळेत वेगळी वेशभूषा करायची असतांना तिने ‘मला कृष्णाची वेशभूषा कर’, असे सांगितले होते. ती कृष्णाच्या स्मरणात स्वतःला विसरत असे.
४. वय ७ ते ८ वर्षे
४ अ. सात्त्विकतेची ओढ
१. तिला चित्रकलेची आवड आहे. ती देवतांची चित्रे काढते. आतापर्यंत तिने कृष्ण आणि इतर देवता यांची चित्रे काढली आहेत.
२. तिला दूरचित्रवाणीवरील ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या मालिका पहायला पुष्कळ आवडते. ती इतरांना त्यांतील कथा सांगते.
३. ती ८ वर्षांची असतांना बाहुलीला कृष्णाची वेशभूषा करायची आणि स्वतः शाल घेऊन कृष्णाची आई बनून खेळायची.
५. वय ९ वर्षे
५ अ. व्यवस्थितपणा : ती घर स्वच्छ ठेवते. ती शाळेतून घरी आल्यावर वस्तू जागच्या जागी ठेवते. तिने तिचे कपडे कपाटात व्यवस्थित ठेवले आहेत. त्याविषयी विचारल्यावर ती सांगते, ‘‘प्रत्येक कृती व्यवस्थित करावी’, असे पू. रमानंद अण्णांनी (पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे संत, वय ४८ वर्षे) यांनी) सांगितले आहे.’’
५ आ. प्रेमभाव : ती कुटुंबातील सर्वांवर प्रेम करते. ती एखादे फळ किंवा खाऊ आधी सर्वांना देते आणि नंतर स्वतः खाते. तिची ताई घरकाम करत असतांना ती ताईला साहाय्य करते.
५ इ. धर्माचरण करणे
१. ती ९ वर्षांची असतांना आम्ही सनातन संस्थेशी जोडले गेलो. आमचे सत्संगाला जाणे चालू झाल्यापासून ती कपाळाला कुंकू लावणे चुकवत नाही. तिला आधुनिक पोशाख घालणे आवडत नाही.
२. ती तिच्या वर्गमैत्रिणींना सांगते, ‘‘कपाळावर कुंकू लावणे चांगले असते. त्यामुळे देव आपले रक्षण करतो.’’ ती तिच्या मैत्रिणींना सेवाकेंद्रात घेऊन जाते.
५ ई. ती प्रतिदिन न चुकता एक घंटा नामजप करते. ती अभ्यास करण्याआधी प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करते.
५ उ. तिच्याकडून चूक झाल्यास ती लगेच क्षमा मागते.
५ ऊ. ती कोणतीही सेवा तळमळीने करते. ती इतरांना साधना सांगण्याचा प्रयत्न करते.
५ ए. प्रतिदिन ती परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राला फूल वाहून शाळेत जाते. ती गुरुस्मरण करते.
५ ऐ. ती पू. रमानंद अण्णांनी सांगितलेली साधनेविषयीची सूत्रे कृतीत आणण्याचा प्रयत्न करते.
६. स्वभावदोष : राग येणे’
– सौ. गीता योगीश, मंगळुरू, कर्नाटक. (२३.५.२०२४)
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.