धारकर्‍यांनी विशाळगड येथील अतिक्रमण हटवण्याच्या संदर्भातील राजकीय आंदोलनात सहभागी होऊ नये !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई यांचे आवाहन !

सांगली – विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात पू. भिडेगुरुजी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चर्चा झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी अतिक्रमण हटवण्याच्या संदर्भात कारवाई करण्याचे अभिवचन दिले आहे. धारकर्‍यांनी ३२ मण सुवर्ण सिंहासन, हिंदवी स्वराज्य खडा पहारा या योजनेसाठी काम करायचे आहे. तरी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांनी विशाळगड अतिक्रमण हटवण्याच्या संदर्भातील राजकीय आंदोलनात सहभागी होऊ नये, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

पत्रकात म्हटले आहे की, पू. भिडेगुरुजी यांच्या आदेशानुसार निवेदन प्रसिद्ध केले आहे. सरकार आणि प्रशासन अतिक्रमण हटवण्याच्या संदर्भात जे काम करणार आहे त्यासाठी पुणे जिल्ह्याचे श्री. संजय जढर आणि श्री. अनिकेतराव भगवे (हिरवे) हे पाठपुरावा करतील. या संदर्भातील माहिती धारकर्‍यांना कळवण्यात येईल.