पुणे – सिंहगड रस्ता परिसरामध्ये कोल्हेवाडी शिवनगर रस्त्यावरील पहाणी नाक्यावर पोलीस अंमलदार ऋषिकेश गायकवाड आणि आर्.सी. फडतरे या २ पोलीस कर्मचार्यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी मंगेश फडके आणि बापू दळवी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
भरधाव वेगाने येणारी चारचाकी गाडी अंमलदार गायकवाड यांनी थांबवून बाजूला घेण्यास सांगितले. त्या वेळी गाडीचालक मंगेशने ‘मी कोण आहे हे तुला ठाऊक नाही ? तू नोकरी कशी करतो तेच बघतो ?’, अशी अरेरावीची भाषा करून त्याने आणि बापू दळवी या दोघांनी त्यांना मारहाण केली.
संपादकीय भूमिका :स्वतः मार खाणारे पोलीस जनतेचे रक्षण कसे करणार ? यातून पोलिसांचा धाकही अल्प झाल्याचे लक्षात येते. |