प्रत्येक प्रसंग आध्यात्मिक दृष्टीकोनातून हाताळणार्‍या बार्शी (सोलापूर) येथील सौ. मंदाकिनी पवार !

‘जानेवारी २०२४ मध्ये माझ्या सासरी एक धार्मिक कार्यक्रम असल्यामुळे मी आणि माझे यजमान श्री. अतुल पवार माझ्या सासरी, बार्शी (सोलापूर) येथे गेलो होतो. तेव्हा साधारणपणे दीड वर्षांनी मी घरी गेले होते. घरची कामे झाल्यावर आम्ही मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी घरून देवद आश्रमात येण्यासाठी निघणार होतो. त्या वेळी ‘माझ्या सासूबाई सौ. मंदाकिनी पवार (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६२ वर्षे) प्रत्येक प्रसंग आध्यात्मिक स्तरावर कसा हाताळतात ?’, याविषयी मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

सौ. मंदाकिनी पवार

१. सणासाठी घरी थांबण्याविषयी विचारल्यावर सासूबाई सौ. मंदाकिनी पवार यांनी ‘कर्मकांडात अडकायला नको’, असे सांगणे

पू. (सौ.) अश्विनीताई आणि श्री.अतुल पवार

मी आणि माझे यजमान श्री. अतुल पवार बर्‍याचदा सणवारी घरी उपस्थित नसतो. या वेळी घरी गेलो असता आम्ही सणाच्या आदल्या दिवशी निघण्याचा विचार करत होतो. तेव्हा मी माझ्या सासूबाई सौ. मंदाकिनी पवार यांना विचारले, ‘‘सण येणार आहे, तर घरी काही करायला हवे का ? किंवा ‘मी थांबायला हवे’, असे काही अपेक्षित आहे का ?’’ त्या वेळी त्यांनी मला सांगितले, ‘‘विशेष काही नसते. मीपण वेगळे काही करणार नाही. आता आपण कर्मकांडात अडकायला नको.’’

२. नातेवाइकांच्या विवाहासंदर्भात ‘मायेत अडकायला नको’, असे सासूबाईंनी सांगणे

माझ्या सासरी आमच्या एका नातेवाइकांचा विवाह होता. ‘‘विवाहाला जाण्याविषयी कसे करायला हवे ?’’ असे मी घरी नातेवाइकांना विचारत होते. तेव्हा एक नातेवाईक म्हणाले, ‘‘सर्वांच्या ओळखी व्हायला हव्यात, या दृष्टीने लग्नाला येण्याचे नियोजन करू शकतो.’’ त्या वेळी माझ्या सासूबाईंनी सांगितले, ‘‘मायेत अडकायला नको. विवाहाला नाही आलीस, तरी चालेल.’’

३. सासूबाईंनी स्वतःसह कुटुंबियांनाही आध्यात्मिक स्तरावर ठेवण्याचा प्रयत्न करणे

माझ्या सासूबाई सौ. मंदाकिनी पवार यांच्या साधनेमुळे त्यांचे अध्यात्मातील दृष्टीकोन प्रगल्भ आहेत. त्या स्वतः आध्यात्मिक स्तरावर रहातात आणि कुटुंबियांनाही आध्यात्मिक स्तरावर ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या साधनेमुळे आम्हाला सर्वांनाच आध्यात्मिक स्तरावर लाभ होत आहे; म्हणून गुरुदेवांच्या चरणी आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता !’

– (पू.) सौ. अश्विनी अतुल पवार (सौ. मंदाकिनी पवार यांच्या स्नुषा, सनातन संस्थेच्या ६९ व्या संत, वय ३४ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२१.६.२०२४)