कोल्हापूर – विशाळगडावरील पशूहत्या, अतिक्रमणे हटवणे आणि दुर्ग संवर्धन यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अत्यंत संवेदनशील आहेत. काही गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत; मात्र तात्काळ त्यांची पूर्तता करून प्रतापगडच्या पायथ्याशी जशी संपूर्ण अतिक्रमण भूईसपाट करण्याची कारवाई झाली, तशी विशाळगड विषयीसुद्धा तत्परतेने कार्यवाही झालेली दिसेल. गड-दुर्गांवर कोणत्याही परिस्थितीत पशूहत्या होणार नाहीत, या संदर्भातही मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागास कठोर निर्देश दिले आहेत. लक्षावधी शिव- शंभू विचारांच्या पाईकांच्या मनातील संकल्प मुख्यमंत्री पूर्ण करणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून विशाळगड अतिक्रमण मुक्त होणारच आहे, असे मत ‘शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेने’चे अक्षय महाराज भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.