कास तलाव भरून वहात आहे
सातारा, ८ जुलै (वार्ता.) – गत काही दिवसांपासून झालेल्या प्रचंड पावसामुळे शहरातील पश्चिम भागातील नागरिकांची तहान भागवणारा कास तलाव भरून वहात आहे. कास बामणोली, तापोळा, कांदाटी खोरे या संपूर्ण परिसरातील ओढे-नाले भरून वहात आहेत. कास पठारामार्गे कास बामणोली मुख्य रस्ता पाण्यामध्ये गेल्याने कासकडे जाणारा मार्ग बांबूचे संरक्षक कुंपण टाकून बंद करण्यात आला आहे.