सनातन संस्कृती महासंघाच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी सरकारच्या अधिपत्याखाली असलेली हिंदु मंदिरे मुक्त करा !

अकोला – सनातन धर्म आणि संस्कृतीचे दमन करण्यासाठी इंग्रजांनी हिंदु मंदिरे आणि देवस्थाने आपल्या कह्यात घेतली. देशाला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे झाली, तरी मंदिरे आणि देवस्थान यांवर शासनाचे नियंत्रण आहे. ती मुक्त करण्यात यावीत, या आशयाचे निवेदन सनातन संस्कृती महासंघाच्या वतीने पंतप्रधानांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून देण्यात आले आहे. यासंदर्भातील निवेदनाची प्रत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच गृहमंत्री यांनाही पाठवण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की,…

१. देशातील ४ लाखांहून अधिक हिंदु मंदिरे आणि देवस्थाने यांवर सरकारचे नियंत्रण आहे. सरकारच्या वतीने अनेक मंदिरे पाडण्यात आली आहेत. मंदिरांच्या मालकीच्या भूमी आणि इमारतींची विक्रीही करण्यात आली आहे.

२. काही ठिकाणी नेमण्यात आलेले विश्वस्त गैरहिंदू आहेत. मंदिराच्या उत्पन्नाचा विनियोग सनातन धर्म आणि संस्कृतीच्या प्रसारासाठी केला जात नाही. सनातन धर्माचे दमन चालू आहे.

३. सरकारच्या अधिपत्याखाली असलेली सर्व हिंदु मंदिरे आणि देवस्थाने मुक्त करण्यात यावीत. मंदिराच्या उत्पन्नाचा विनियोग सनातन धर्म आणि संस्कृतीच्या प्रसारासाठी तसेच हिंदूंच्या हितासाठी होईल, याची व्यवस्था करावी.

निवेदन देण्यासाठी महासंघाचे सर्वश्री हेमंत जकाते, जयंत इंगळे, विनोद देव, विजय केंदरकर, मिलिंद गायकवाड, देवानंद गहिले, गजानन चांदवडकर, मनोज अग्रवाल, नरेंद्र कराळे, अमोल देशपांडे, ऋषिकेश जकाते, सुबोध देशमुख, अमित अग्रवाल, हेमल खिलोसीया, मोहित नायसे, मीनाक्षी पवार, प्राजक्ता सपकाळ, मनीषा देशपांडे उपस्थित होते.