पुणे – राज्यात पोलीस भरती प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. पुणे शिवाजीनगर येथील पोलीस मैदानावर भरती प्रक्रिया चालू आहे. या वेळी संगमनेर येथील तुषार भालके या २७ वर्षीय युवकाचा धावतांना खाली कोसळून मृत्यू झाला. यापूर्वी मुंबई येथे भरती प्रक्रिया चालू असतांना २ युवकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तुषार शिवाजीनगर पोलीस मैदानावर सकाळी ८ वाजता आला होता. त्यानंतर पळतांना तो भूमीवर कोसळला. त्याला तात्काळ ‘ससून रुग्णालया’त उपचारासाठी भरती केले. उपचारांच्या वेळी त्याचा रक्तदाब अल्प होऊन त्याचा मृत्यू झाला.