Pakistan Support : सामाजिक माध्‍यमांवर लाहोरचे छायाचित्र पोस्‍ट करून ‘पाकिस्‍तान खूप सुंदर आहे’ असे सांगणार्‍या शाहरुखच्‍या विरोधात तक्रार

शाहरुख अहमद व त्याने पोस्ट केलेले छायाचित्र (सौजन्य : ऑप – इंडिया)

बरेली (उत्तरप्रदेश) – येथे शाहरुख अहमद या तरुणाने त्‍याच्‍या सामाजिक माध्‍यमावरील खात्‍याच्‍या प्रोफाईलवर (स्‍वतःचा परिचय सांगणे) पाकिस्‍तानातील लाहोर शहराचे एक छायाचित्र पोस्‍ट करत पाकचा झेंडाही दाखवला. या छायाचित्राच्‍या खाली  ‘पाकिस्‍तान पुष्‍कळ सुंदर आहे’, असे लिहिले होते. हे प्रोफाईल पाहिल्‍यानंतर विश्‍व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते हिमांशू पटेल यांनी ‘एक्‍स’वर याची माहिती प्रसारित केली. यानंतर शाहरुख याने त्‍याचे प्रोफाईल खासगी केले आहे. त्‍यामुळे आता ही माहिती कुणी पाहू शकणार नाही. पटेल यांनी म्‍हटले की, जर पोलिसांनी याची नोंद घेऊन कारवाई केली नाही, तर रितसर तक्रार केली जाईल. शाहरुख बरेलीच्‍या जाफरपूरचा रहाणारा आहे.

बरेली पोलिसांनी त्‍यांच्‍या अधिकृत एक्‍स खात्‍यावरून माहिती दिली की, स्‍थानिक  पोलीस ठाण्‍याच्‍या प्रमुखांना या संदर्भात आवश्‍यक कायदेशीर कारवाई करण्‍याच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या आहेत.

संपादकीय भूमिका

  • अशा पाकप्रेमींना दिवाळखोर होणार्‍या पाकिस्‍तानमध्‍ये पाठवणेच योग्‍य शिक्षा असेल !
  • अशा पाकप्रेमींच्‍या विरोधात काँग्रेसवाले कधी तोंड उघडत नाहीत !