राहुल गांधी यांच्या हिंदु धर्मियांविषयीच्या वक्तव्याविषयी त्यांची खासदारकी रहित करा !

हिंदु जनजागृती समितीचे हुपरी पोलीस ठाण्यात निवेदन

हुपरी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक एन्.आर्. चौखंडे यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

हुपरी (जिल्हा कोल्हापूर) – काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे आणि द्वेषपूर्ण असे संबोधल्याने हिंदु समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. तरी राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व तात्काळ रहित करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हुपरी पोलीस ठाण्यात देण्यात आले. राष्ट्रपतींच्या नावे असलेले हे निवेदन साहाय्यक पोलीस निरीक्षक एन्.आर्. चौखंडे यांनी स्वीकारले.

या प्रसंगी शिवसेना उपशहरप्रमुख श्री. अरुण गायकवाड, युवासेना शहरप्रमुख श्री. अजित उगळे, धर्मसेवक श्री. पृथ्वीराज घोरपडे, धर्मरक्षक सर्वश्री सचिन माळी, संदीप निकम, अमोल महाजन, संदीप कुलकर्णी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. महादेव आडावकर आणि श्री. विकास पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहरप्रमुख श्री. सचिन इंगवले आणि उपशहरप्रमुख श्री. ऋषिकेश साळी, बजरंग दलाचे श्री. विजय काशीद, विश्व हिंदु परिषदेचे श्री. अनिल तोडकर, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री नितीन काकडे, वीरेंद्र डेंगळे, निखिल कांबळे, विशाल विभूते, संतोष चव्हाण, प्रसाद देसाई, सुरजित घोरपडे, शिवाजी शिनगारे, ऋषिकेश दिवाण उपस्थित होते.