देवीस्वरूप आणि गुरुस्वरूप असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

१. श्री विद्याचौडेश्वरीदेवीच्या आगमनाच्या मिरवणुकीत श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना चालतांना पाहून ‘देवीच आश्रमात चालत येत आहे’, असे वाटणे : ‘रामनाथी आश्रमात श्री विद्याचौडेश्वरीदेवीचे मिरवणुकीने आगमन होणार होते. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ त्या मिरवणुकीतून चालत येत होत्या. त्यांना पाहून ‘सर्व साधकांसाठी साक्षात् श्री विद्याचौडेश्वरीदेवीच चालत रामनाथी आश्रमात येत आहे’, असे मला जाणवले.

श्री. तरुण आवार

२. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना पाहिल्यावर मन स्थिर होऊन सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे स्मरण होणे : ‘रामनाथी आश्रमात श्री भवानीदेवीची प्रतिष्ठापना होणार होती. तेव्हा श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ साक्षात् आई भवानीसारख्याच दिसत होत्या. त्यांना पाहून माझे अस्थिर असलेले मन स्थिर झाले आणि मला गुरुमाऊलींचे स्मरण झाले. माझा भाव जागृत झाला आणि मन पुष्कळ आनंदी झाले.

३. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना पाहिल्यावर आपोआप त्यांच्या चरणी शरणागतीने प्रार्थना होते.

४. मला जेव्हा आईची आठवण येते, तेव्हा श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचीही आठवण येते.’

– श्री. तरुण आवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक