दूध उत्पादक शेतकर्‍यांना योग्य भाव मिळण्यासाठी विधीमंडळाच्या पायर्‍यांवर विरोधकांची निदर्शने !


मुंबई, ४ जुलै (वार्ता.) – राज्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या दुधाला योग्य भाव देण्यात यावा, या मागणीसाठी विधीमंडळ परिसरात महाविकास आघाडी आघाडीच्या आमदारांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली ४ जुलै या दिवशी निदर्शने केली. विरोधी पक्षाच्या आमदारांनी हातात दुधाची बाटली आणि टाळ हातात घेऊन ‘रामकृष्ण हरी, दुधाला भाव तरी द्या रे’, ‘रामकृष्ण हरी, शेतकरी फिरतोय दारोदारी’ अशा घोषणा देत सरकारच्या विरोधात निदर्शने केली. विविध घोषणा लिहिलेले फलकही या वेळी विरोधकांनी हातात धरले होते.