Putin Condoles Hathras : हाथरस घटनेवर पुतिन यांनी पाठवला शोकसंदेश


मॉस्‍को (रशिया) – रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष व्‍लादिमिर पुतिन यांनी उत्तरप्रदेशातील हाथरस येथील चेंगराचेंगरीच्‍या प्रकरणी भारताच्‍या राष्‍ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शोकसंदेश पाठवला आहे. पुतिन यांनी संदेशात लिहिले की, उत्तरप्रदेशमधील दुर्घटनेत मृत्‍यूमुखी पडलेल्‍यांच्‍या कुटुंबियांविषयी मला सहानुभूती आहे. आम्‍ही दु:खी आहोत. या दुर्घटनेत घायाळ झालेल्‍यांची प्रकृती लवकरात लवकर बरी होवो, त्‍यासाठी माझ्‍या सदिच्‍छा.