परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगाच्या वेळी सद्गुरु सत्यवान कदम यांना आलेल्या अनुभूती !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील संत आणि प्रसारातील संत यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या सत्संगात मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

सद़्‍गुरु सत्‍यवान कदम

१. मी, सद्गुरु नंदकुमार जाधव आणि पू. अशोक पात्रीकर (सनातनचे ४२ वे (समष्टी) संत, वय ७३ वर्षे) परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगासाठी जात असतांना मला आनंद जाणवत होता.

२. सत्संगाच्या ठिकाणी ‘सर्व संत एकत्रित आल्यावर आनंदात वाढ झाली’, असे मला अनुभवता आले.

३. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे सत्संगाच्या ठिकाणी आगमन झाले. तेव्हा ‘प्रत्यक्ष देवीच येत आहे’, असे मला जाणवले.

४. परात्पर गुरु डॉ. आठवले सत्संगाच्या ठिकाणी आले, तेव्हा अधिक प्रमाणात आनंद जाणवू लागला.

५. माझ्या दोन्ही नाकपुड्या एकाच वेळी चालू झाल्या. माझे मन निर्विचार होऊन मला एक वेगळीच आनंदाची स्थिती अनुभवता आली.’

– (सद्गुरु) सत्यवान कदम, धर्मप्रचारक (सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी), (४.८.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक