संपादकीय : हिंदू हिंसाचारी असते, तर…?

संसदेमध्ये राहुल गांधी व पंतप्रधान नरेंद्र मोदी (उजवीकडे)

‘जे  स्वतःला हिंदु म्हणवतात, तेच २४ घंटे हिंसाचारी असतात’, असे विधान काँग्रेसचे राहुल गांधी यांनी केल्यावर ‘हा या शतकातील जागतिक विनोद आहे’, असे कुणी म्हटल्यास आश्चर्य वाटू नये ! हिंदू आणि हिंसाचार हे कुठल्याही अंगाने जुळत नाही. याउलट ‘जे स्वतःला मुसलमान म्हणवतात, ते २४ घंटे हिंसाचारी असतात’, असे जर कुणी लोकसभेत म्हटले असते, तर त्याचे प्रत्यक्ष रूप या विधानाच्या दुसर्‍याच मिनिटाला लोकसभेतच मिळाले असते. असे विधान करणार्‍याला तेथेच चोपण्यात आले असते, हे नाकारता येणार नाही. त्याचप्रमाणे संपूर्ण देशात आगडोंब उसळला असता. संबंधित पक्षाच्या कार्यालयांवर, नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर आक्रमणे चालू झाली असती, इतकेच नव्हे, तर अन्य राजकीय पक्षही अशा सदस्यावर आणि त्याच्या पक्षावर तुटून पडले असते; मात्र हिंदूंना स्वतःला हिंदु म्हणवणार्‍याने असे विधान करूनही लोकसभेत आणि संपूर्ण देशातही काही झालेले नाही. सर्व काही शांत आहे. कायदा आणि सुव्यवस्था कायम आहे. यातून ‘हिंदू हिंसाचारी नाहीत’, हे सिद्ध होते. जगभरात गेल्या काही दशकांपासून जिहादी आतंकवाद चालू आहे. काश्मीरच नव्हे, तर संपूर्ण भारतात जिहादी आतंकवाद अस्तित्वात आहे. जिहादी आतंकवादी ‘मुसलमान’ असतात, हे जगजाहीर आहे; मात्र हेच काँग्रेसवाले आणि अन्य ढोंगी निधर्मीवादी कधीही या जिहादी आतंकवाद्यांना ‘मुसलमान आतंकवादी’ म्हणत नाहीत. एकदाही त्यांनी असे कधी विधान केलेले नाही. उलट ‘आतंकवाद्यांना धर्म नसतो’, असे म्हणत ते या मुसलमान आतंकवाद्यांचा बचाव करत असतात. त्याच्या उलट याच काँग्रेसवाल्यांनी हिंदूंना मात्र ‘भगवे आतंकवादी’ ठरवून टाकले आहे. हिंदूंना आतंकवादी म्हणण्यासाठी काही हिंदुत्वनिष्ठांना खोट्या आरोपांवरून अटक करून त्यांचा अनेक वर्षे छळ करण्यात आला. इतके करूनही कधी हिंदू आतंकवादी झाले नाहीत कि त्यांनी कुठे हिंसाचार केला नाही. हिंदूंनी या विधानावर जो काही विरोध केला, तोही वैध मार्गानेच केला आणि आजही करत असतात, तरीही राहुल गांधी हिंदूंना ‘हिंसाचारी’ म्हणत आहेत आणि लोकसभेतील भाजप वगळता अन्य कोणत्याही पक्षातील हिंदु खासदार उठून उभा राहिला नाही आणि त्याने राहुल गांधी यांना खडसावले नाही, ही वस्तूस्थिती आहे. यावरून ‘हिंदू हिंसाचारी नाहीत’, हे स्पष्ट होते. तसेच हिंदूंना हिंसाचारी म्हणणारे मुसलमान आणि ख्रिस्ती नाही, तर हिंदूच आहेत, हेही लक्षात घ्यायला हवे. राहुल गांधी स्वतःला हिंदु मानतात. त्यामुळे तेच हिंदूंना हिंसाचारी म्हणत आहेत आणि त्यांच्या पक्षातील ९८ खासदारही त्याचे समर्थन करत आहेत. इतर कुठल्याही धर्मात असे कधी कुणी बोलणार नाही आणि तो बोललाच, तर त्याला त्याचे परिणाम भोगावे लागणार, हे नाकारताच येणार नाही; मात्र हिंदूंच्या संदर्भात असे नाही. यावरून ‘हिंदू हिंसाचारी नाहीत.’

राहुल गांधी यांनी त्यांच्या विधानावर स्पष्टीकरण देतांना त्यांनी ‘संपूर्ण हिंदूंसाठी नाही, तर पंतप्रधान मोदी, भाजप आणि रा.स्व. संघ यांच्यासाठी’ असे विधान केल्याचे म्हटले आहे. ‘हाही विनोदच आहे’, असे कुणी म्हटल्यास आश्चर्य वाटू नये; कारण पंतप्रधान मोदी ‘सबका साथ सबका विकास और सबका विश्वास’ या विचारानुसार कार्य करत आहेत. त्यांनी त्यांच्या १० वर्षांच्या काळात कधीही हिंदूंसाठी म्हणून कुठे कुणाला हिंसाचार करण्यास सांगितले आहे, असेही नाही. भाजपही हिंदूंना हिंसाचार करायला सांगतो, असेही नाही. उलट ‘हिंदूंवर अत्याचार होत असतांनाही तो प्रत्युत्तर देत नाही’, असे हिंदूंचेच म्हणणे असते. भाजप हिंसाचारी असता, तर केरळ आणि बंगाल या राज्यांमध्ये त्याच्या शेकडो कार्यकर्त्यांची हत्या होत असतांना तो शांत राहिला नसता. ‘संघाचेही असेच आहे’, असेच हिंदूंना वाटत असते. त्यामुळे या तिघांनाही हिंसाचारी म्हणणे, हा राहुल गांधी यांचा मूर्खपणाच म्हणावा लागेल. ‘मग राहुल गांधी यांनी असे विधान का केले ?’, असा प्रश्न उपस्थित होतो. याचे उत्तर ‘मुसलमानांना खुश’ करणे इतकेच आहे. जिहादी आतंकवाद्यांकडे दुर्लक्ष करून हिंदूंना झोडपण्यासाठीच राहुल गांधी यांनी हे विधान केले आहे आणि ही काँग्रेसची १०० वर्षांची परंपरा आहे. मोहनदास गांधी यांच्यापासून ही परंपरा चालू झाली आहे. फाळणीच्या वेळी १० लाख हिंदूंचा नरसंहार होऊनही, काश्मीरमध्ये सहस्रो हिंदूंना ठार करून लक्षावधी हिंदूंना पलायन करण्यास भाग पाडूनही िहंदू कधी हिंसाचारी झालेले नसतांना हिंदूंना ‘आतंकवादी’ आणि ‘हिंसाचारी’ म्हणून त्यांना दाबून टाकण्यासाठीच काँग्रेस असा विचार पसरवत असते.

हिंसाचाराच्या विरोधात उभे रहा !

जर हिंदू खरेच हिंसाचारी असते, तर राहुल गांधी यांना हे विधान करता आले असते का ? जसे मुसलमान हिंसाचारी आहेत, असे ते कधीच म्हणू शकत नाहीत, तसेच हिंदूंच्या संदर्भात झाले असते. हिंदू हिंसाचारी असते, तर भारतात एकही अल्पसंख्यांक म्हणजे मुसलमान शिल्लक राहू शकला नसता. काँग्रेस नावाचा पक्षही शिल्लक राहिला नसता. हिंदू हिंसाचारी असते, तर भारत जागतिक महासत्ता झाला असता. अमेरिका, युरोप आदींना तो पुरून उरला असता. पाकिस्तान जागतिक नकाशावरून केव्हाच नष्ट झाला असता; मात्र हिंदू हिंसाचारी नाहीत, हेच या घटना झालेल्या नसल्याने लक्षात येते. हिंदूंनी त्यांच्या इतिहासात कधीही हिंसाचार केलेला नाही आणि पुढेही करू शकणार नाही. याचे कारण त्यांच्या धर्माची शिकवण आणि संस्कृती ! याउलट जे आतंकवादी कारवाया करतात, त्यांचा धर्म आणि त्यांची संस्कृती काय आहे, हे जगाला ठाऊक आहे. हिंदूंनी हिंसाचारी न होता केवळ प्रत्युत्तर देणे तरी आवश्यक आहे; मात्र त्यांना धर्मनिरपेक्षतेचे आणि अहिंसेचे इतके डोस पाजण्यात आले आहेत की, त्यांची क्षात्रवृत्ती आणि क्षात्रतेज केव्हाच नष्ट झाले आहे. त्यामुळेच हिंदूंचे अस्तित्व काश्मीरमधून नष्ट झाले आहे. ९ राज्यांत हिंदू अल्पसंख्यांक झाले आहेत. देशात ५ सहस्रांहून अधिक अशी ठिकाणे आहेत, जेथे हिंदूंना भविष्यात काश्मीरमधील हिंदूंचे पलायन झाले, तसे पलायन करावे लागू शकते. अशा बिकट स्थितीत आज हिंदू जगत आहेत. हिंदूंना असे जगण्यास राहुल गांधी, काँग्रेस आणि अन्य निधर्मीवादी पक्ष ज्यात हिंदूंचाच भरणा आहे, ते भाग पाडत आहेत. त्यांच्यामुळे देशाची फाळणी झाली होती. फाळणीच्या वेळी बंगालमध्ये काही ठिकाणी हिंदूंनी धर्मांध मुसलमानांना प्रत्युत्तर देण्यास प्रारंभ केल्यावर मोहनदास गांधी तेथे पोचले आणि हिंदूंनी प्रत्युत्तर देऊ नये; म्हणून आमरण उपोषण करून हिंदूंना माघार घेण्यास भाग पाडले. आजही अशीच स्थिती आहे. हिंदू त्यांच्यावरील आणि धर्मावरील आघातांच्या विरोधात उभे ठाकतात, तेव्हा हेच राहुल गांधी आणि अन्य राजकीय पक्ष हिंदूंचे खच्चीकरण करतात अन् त्यांना दाबतात. दुसरीकडे जिहादी हवे ते करण्यास मुक्त असतात. कर्नाटकात सध्या काँग्रेसचे सरकार आल्यापासून याहून वेगळे काहीही घडत नसल्याचे त्यांना सत्तेवर बसवणार्‍या हिंदूंनाच दिसत आहे. हिंदू हिंसाचारी असू शकत नाहीत; मात्र हिंदूंनी त्यांच्यावरील अत्याचार आणि अन्याय यांविरोधात उभे ठाकण्याची आवश्यकता आहे, हे यातून पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे !

‘मुसलमान २४ घंटे हिंसाचारी असतात’, असे राहुल गांधी यांनी म्हटले असते, तर त्याचा प्रत्यय त्यांना तात्काळ आला असता !