साधना शिबिरात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याकडून सद्गुरु सत्यवान कदम यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

‘साधकांची साधना अन् सेवा चांगली व्हावी’, यांसाठी दोन शिबिरांचे आयोजन केले होते. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी दोन्ही शिबिरे चांगली होण्यासाठी पुष्कळ कष्ट घेतले. तेव्हा मला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत. 

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

१. ‘शिबिरातील प्रत्येक विषय चांगला व्हावा’, यासाठी प्रयत्न करणे

‘शिबिरातील प्रत्येकच विषय चांगला कसा होईल ?’, या दृष्टीने श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ प्रयत्न करत असत. एखादा विषय झाल्यावर ‘‘अजून काही राहिले आहे का ? तुमच्या काही लक्षात आले असेल, तर सांगा’’, असे त्या विचारत असत.

२. ‘साधकांची अंतर्मुखता वाढावी’, यासाठी प्रयत्न करणे

सद़्‍गुरु सत्‍यवान कदम

‘साधकांना शिबिराचा १०० टक्के लाभ व्हावा’, यासाठी श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ ‘साधकांची अंतर्मुखता कशीवाढेल ?’, हे पहात असत.

३. साधनेचे चांगले प्रयत्न केलेल्या साधकांना प्रोत्साहन देणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी ज्या साधकांनी साधनेचे चांगले प्रयत्न केले, त्यांना त्याविषयी सांगायला लावून प्रोत्साहन दिले.

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अपेक्षित असे शिबिर होण्यासाठीची तळमळ !

‘गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) अपेक्षित असे शिबिर व्हावे’, यासाठी असलेली त्यांची तळमळ मला जाणवली आणि त्यातून शिकताही आले.’

– (सद्गुरु) सत्यवान कदम, धर्मप्रचारक (सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी) (४.८.२०२३)