इस्लामाबाद (पाकिस्तान) – ‘सेंटर फॉर रिसर्च अँड सिक्युरिटी स्टडीज’च्या अहवालानुसार वर्ष २०२४ च्या दुसर्या तिमाहीत पाकिस्तानमध्ये २४० आतंकवादी घटना आणि आतंकवादविरोधी कारवाया झाल्या. यात ३८० लोकांचा मृत्यू झाला आणि २२० नागरिक, सुरक्षा कर्मचारी आणि गुन्हेगार घायाळ झाले.
या अहवालात खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान प्रांत हिंसाचाराचे केंद्र असल्याचे म्हटले आहे. दुसर्या तिमाहीत पाकिस्तानमधील हिंसाचार आणि घातपात यांच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. देशातील एकूण हिंसाचार १२ टक्क्यांनी न्यून झाला आणि पहिल्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च) ४३२ च्या तुलनेत या वेळी ३८० मृत्यूंची नोंद झाली. बलुचिस्तानमध्ये सर्वांत लक्षणीय सुधारणा दिसून आली, तेथे हिंसाचार ४६ टक्क्यांनी न्यून झाला, पहिल्या तिमाहीत १७८ मृत्यू झाले, जे या वर्षाच्या दुसर्या तिमाहीत ९६ पर्यंत घसरले.
संपादकीय भूमिकापाकिस्तानने जे परेले तेच उगवत आहे आणि त्याचा घात करत आहे ! |