भुशी धरणाच्या परिसरात ५ जण वाहून गेले !

लोणावळा – येथील भुशी धरणाच्या मागील बाजूस असलेल्या डोंगरामधून वहाणार्‍या धबधब्याच्या पाण्यात एकाच कुटुंबातील ५ जण वाहून गेले आहेत. अन्सारी कुटुंबातील ५ जण येथील पाण्यात उतरले होते; मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते प्रवाहासमवेत वाहून गेले आहेत. ग्रामस्थ, वन्यजीव रक्षक आणि पोलीस यांच्याकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. २ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. या धबधब्याला ‘रेल्वे वॉटरफॉल’ म्हणून ओळखले जाते. हे पाणी नंतर भुशी धरणात येते.