सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सत्संगात केलेले अमूल्य मार्गदर्शन !
श्री. आशिष जोशी यांनी समष्टी साधना करण्याविषयी त्यांच्या मनातील विचार सांगितल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांना केलेले मार्गदर्शन येथे दिले आहे.
श्री. आशिष जोशी : बरेच दिवस माझ्या मनात ‘मी समष्टीसाठी काय करू शकतो ? मला माझा देह समष्टीसाठीच झिजवायचा आहे’, असे विचार येत आहेत. पूर्वी माझ्या मनात असे पुष्कळ विचार असायचे; पण मध्यंतरीच्या काळात ते विचार न्यून झाले होते. आता पुन्हा ते विचार यायला लागले आहेत.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : अशा वेळी ‘समष्टी साधनेसाठी जे गुण आवश्यक आहेत, ते सगळे गुण माझ्यात आहेत का ?’, असा विचार करा. त्यासाठी सनातनचा ‘समष्टी साधनेसाठी आवश्यक गुण’, या ग्रंथाचा अभ्यास करा. जे गुण नाहीत, ते गुण अंगी बाणवण्यासाठी लक्ष एकाग्र करा. त्यासाठी स्वयंसूचना द्या. मग जीवनभर समष्टीच करा. कळले ?