संतांप्रती भाव असलेली वर्धा येथील ५७ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अवंती सुनील कलोडे (वय १३ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. अवंती सुनील कलोडे ही या पिढीतील एक आहे !

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ –  सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘वर्ष २०२३ मध्ये ‘कु. अवंती सुनील कलोडे उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची आध्यात्मिक पातळी ५६ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२४ मध्ये तिची आध्यात्मिक पातळी ५७ टक्के झाली आहे. तिच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, तिची साधनेची तळमळ आणि तिच्यातील  भाव यांमुळे आता तिची साधनेत प्रगती होत आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१२.४.२०२४)
कु. अवंती सुनील कलोडे

कु. अवंती सुनील कलोडे हिची तिच्या आईला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

१. उत्साही

‘कु. अवंती दिवसभर उत्साही आणि आनंदी रहाते.

सौ. वंदना सुनील कलोडे

२. शिकण्याची आणि जिज्ञासू वृत्ती असणे

तिला प्रत्येकच नवीन गोष्ट शिकायला आवडते. ती पुष्कळ जिज्ञासू आहे.

३. धर्माचरण करणे

तिला कुंकू लावायला आवडते. ती प्रतिदिन कपाळावर कुंकू लावते. तिला सात्त्विक वेशभूषा आवडते.

४. इतरांना साहाय्य करणे

अवंती मला नेहमी घरकामात साहाय्य करते. तिला कुठलेही काम सांगावे लागत नाही. ती स्वतःहून जे दिसेल, ते काम करते. ती मला सेवेतही साहाय्य करते. तिला कुठलीही सेवा सांगितली, तरी अवंती ती आनंदाने करते.

५. इतरांचा विचार करणे

मला कधी सेवेहून यायला उशीर झाला, तर ती स्वतःहून मला घरकामात साहाय्य करते.

६. भाव

संतांविषयी तिच्या मनात पुष्कळ भाव आहे. संत किंवा सद्गुरु इकडे आल्यावर त्यांना भेटायची तिला पुष्कळ ओढ असते.

६ अ. पू. श्रीमती मंदाकिनी डगवार यांच्या प्रती असलेला भाव !

१. एकदा पू. डगवारमावशी वर्धा येथे आल्या होत्या. तेव्हा अवंतीची शाळा असल्यामुळे तिला त्यांना भेटायला येता आले नाही. शाळेतून आल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी ती पुष्कळ रडली.

२. एकदा मी रामनाथी (गोवा) आश्रमात शिबिरासाठी जाणार होते. मी शिबिरासाठी जातांना तिने मला आवर्जून सांगितले, ‘‘पू. डगवारमावशी भेटतील, तर त्यांना अवश्य भेट.’’ मी शिबिराहून घरी परत आल्यावर तिला पू. डगवारमावशी भेटल्याचे सांगितल्यावर तिला पुष्कळ आनंद झाला.

६ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती असलेला भाव : अवंतीला सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांप्रती पुष्कळ भाव आहे. एकदा मी एका शिबिरासाठी रामनाथी (गोवा) आश्रमात जाणार होते, तेव्हा तिची आश्रमात यायची पुष्कळ इच्छा होती. मी आश्रमातून परत आल्यावर ती मला सतत परम पूज्यांविषयी विचारत होती, ‘‘परम पूज्य तुला भेटले का ?’, ‘ते तुझ्याशी काय बोलले ?’

७. जाणवलेला पालट

७ अ. साधनेची ओढ वाढणे : अवंतीची साधनेची ओढ वाढली आहे.

१. अवंती नियमित प्रार्थना, नामजप आणि सारणीलिखाण करते.

२. ती नियमित व्यष्टी साधनेचा आढावा देते. ‘तिची अंतरातून साधना चालू आहे’, असे मला जाणवते.

३. व्यष्टी साधनेचा आढावा असतांना तिला भावजागृतीसाठीचे प्रयोग घ्यायला पुष्कळ आवडतात.

७ आ. राग न्यून होणे : अवंतीला आधी लगेच राग यायचा. तिला कुठल्याही गोष्टीला ‘नाही’ म्हटल्यावर ती लगेच रुसायची. मनाविरुद्ध घडल्यावर ती चिडचिड करायची; पण आता ती परिस्थिती लगेच स्वीकारून शांत आणि स्थिर रहाते. आता तिचा ‘राग येणे’ हा स्वभावदोष पुष्कळ न्यून झाला आहे.

८. स्वभावदोष 

आळशीपणा

श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. वंदना सुनील कलोडे, वर्धा (१८.४.२०२४)