हिंदु राष्ट्राचा सामूहिक उद्घोष
एकत्र जमल्यावर एका क्षणी आनंद व्यक्त करतांना जवळिकीचे आणि आपुलकीचे दर्शन घडवणारे महोत्सवातील मान्यवर !
जरी आमुची मते वेगळी, असे आमुची कृती आगळी । ध्येय आमचे परी हिंदु राष्ट्राचे, कार्य हे धर्मसंस्थापनेचे ।।मंदिरात जातांना ‘साक्षात् भगवंताला भेटण्यासाठी जात आहे’, असा श्रद्धावान हिंदूंचा भाव असतो. या श्रद्धेने आणि भावाने जेव्हा हिंदू मंदिरात जातात, तेव्हा त्यांना भगवंताची, तसेच आनंदाची अनुभूती येते. अशा मंदिरात नास्तिक आणि जिहादी प्रवेश करत असून त्यांना रोखण्याची आवश्यकता नाही का ? सर्व मंदिरांचा कारभार हिंदूंच्या दानावर चालतो. धर्मांतरित हिंदू जर मंदिरात येऊ इच्छित असतील, तर त्यांचे अवश्य स्वागत केले जाईल; परंतु जे श्रद्धाहीन आहेत, त्यांना मंदिरात प्रवेश कदापि मिळू नये. भारतभरातील मंदिरांत हा प्रवेश निषिद्ध असावा. – कु. कृतिका खत्री, सनातन संस्था |