गौरी लंकेश आणि प्रा. कलबुर्गी हत्या प्रकरणात हिंदुत्वनिष्ठांची बाजू मांडणार्‍या अधिवक्त्यांचा वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात सत्कार !

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचा ६ वा दिवस (२९ जून) 

अधिवक्ता कृष्णमूर्ती पी. (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना आमदार श्री. टी. राजा सिंह लोध
अधिवक्ता उमाशंकर मेगुंडी (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना आमदार श्री. टी. राजा सिंह लोध
अधिवक्त्या (सौ.) दिव्या मेगुंडी यांचा सत्कार करतांना आमदार श्री. टी. राजा सिंह लोध
अधिवक्ता अविनाश मसूती (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना आमदार श्री. टी. राजा सिंह लोध

रामनाथ (गोवा), २९ जून (वार्ता.) – कर्नाटक येथील गौरी लंकेश आणि प्रा. कलबुर्गी यांच्या हत्या प्रकरणात संशयित म्हणून अटक करण्यात आलेल्या हिंदुत्वनिष्ठांची न्यायालयात बाजू मांडणारे कर्नाटक येथील अधिवक्ता कृष्णमूर्ती पी., अधिवक्ता उमाशंकर मेगुंडी, अधिवक्त्या (सौ.) दिव्या मेगुंडी आणि अधिवक्ता अविनाश मसूती यांचा भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार श्री. टी. राजा सिंह लोध यांनी शाल, श्रीफळ आणि देवतांची प्रतिमा देऊन सत्कार केला.

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक –


अधिवक्ता कृष्णमूर्ती पी. (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना अधिवक्ता अमृतेश एन्.पी.
अधिवक्ता अविनाश मसूती (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना अधिवक्ता अमृतेश एन्.पी.
अधिवक्ता नागेश जोशी (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना अधिवक्ता अमृतेश एन्.पी.

कर्नाटक येथील अधिवक्ता अमृतेश एन्.पी. यांनीही या वेळी वरील सर्व अधिवक्त्यांचा सत्कार केला. मडगाव बाँबस्फोट प्रकरणात हिंदुत्वनिष्ठांची बाजू मांडून त्यांची निर्दोष सुटका करणारे हिंदु विधीज्ञ परिषदेचे गोवा समन्वयक अधिवक्ता नागेश जोशी यांचाही या वेळी अधिवक्ता अमृतेश एन्.पी. यांनी सत्कार केला. या वेळी अधिवक्ता कृष्णमूर्ती पी. यांनी मनोगत व्यक्त केले.

आमच्या मनात निरपराध हिंदुत्वनिष्ठांच्या मुक्ततेसाठी अग्नी धगधगत असतो ! – अधिवक्ता कृष्णमूर्ती पी.

अधिवक्ता कृष्णमूर्ती पी

आज उपस्थित सर्व अधिवक्ते परमपूज्य गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी) दिलेले हिरे आहेत. त्यांनी कोणताही मोबदला न घेता दिवसरात्र संशोधन करून अन् न्यायालयात जाऊन हिंदुत्वनिष्ठांसाठी खटले लढले. हे अत्यंत कठीण आहे. आमच्या मनात निरपराध हिंदुत्वनिष्ठांना कारागृहातून बाहेर काढण्यासाठी अग्नी धगधगत असतो. ही आग दिवसेंदिवस अधिक प्रज्वलित होईल.

क्षणचित्र

मनोगत व्यक्त करण्यापूर्वी अधिवक्ता कृष्णमूर्ती पी. यांचा भाव जागृत झाला होता.

वडिलांप्रमाणेच ‘हिंदु राष्ट्रा’साठी योगदान देईन ! – कु. चंद्रशेखर सिंह लोध (टी. राजा सिंह लोध यांचा मुलगा)

कु. चंद्रशेखर सिंह लोध

या प्रसंगी भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांचा मुलगा कु. चंद्रशेखर सिंह (वय १७ वर्षे) मनोगत व्यक्त करतांना म्हणाला, ‘‘ज्याप्रमाणे माझे वडील हिंदु राष्ट्रासाठी योगदान देत आहेत, त्याप्रमाणे मीही हिंदु राष्ट्रासाठी योगदान देईन. मी शासनकर्त्यांना सांगू इच्छितो की, तुम्ही राजकारण नंतर करा, त्या अगोदर हिंदु राष्ट्रासाठी हिंदूंना संघटित करण्याचा प्रयत्न करा.’’

आमदार टी. राजासिंह लोध (मध्यभागी) यांचा सत्कार करतांना ओडिशा येथील ‘गोरक्षा दला’चे अधिवक्ता सुरेशकुमार पांडा (डावीकडे) आणि मध्यप्रदेश येथील हिंदु युवा संघटनेचे अध्यक्ष श्री. निर्मल पाटीदार (उजवीकडे)

या प्रसंगी मध्यप्रदेश येथील हिंदु युवा संघटनेचे अध्यक्ष श्री. निर्मल पाटीदार आणि ओडिशा येथील ‘गोरक्षा दला’चे अधिवक्ता सुरेशकुमार पांडा यांनी गोमातेची प्रतिमा देऊन आमदार टी. राजासिंह लोध यांचा व्यासपीठावर सत्कार केला.