सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची साधना आणि त्यांचे कार्य यांमुळे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेचे कार्य निश्चितपणे सिद्धीस जाणार !

‘वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या निमित्ताने मनोगत !

१. जगातील कित्येक संस्कृतींचा लोप होऊनही सनातन धर्म जिवंत !

श्री. श्रीनिवास गोटे

सनातन संस्थेशी मी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’द्वारे आणि माझ्या मुलामुळे (श्री. आशुतोष गोटे) साधारण १५ वर्षांपूर्वी जोडलो गेलो. ‘सनातन प्रभात’मधील लेख आणि संस्थेचे कार्य बघून कृतकृत्य होत होतो. आपल्या धर्मावर गेली १ सहस्र वर्षे सतत शस्त्रप्रहार होत आहेत. आम्ही स्वतंत्र झालो, तरी परिस्थितीत फारसा फरक झाला नाही. इतकी वर्षे सतत अत्याचार सहन करत आमचा धर्म आजही जिवंत आहे. जगातील कित्येक संस्कृतींचा लोप झाला; पण सनातन धर्म जिवंत आहे.

२. सरकारकडून विशिष्ट समाजाचे लांगूलचालन ! 

केवळ एका विशिष्ट समाजामुळे भारतीय जनता त्रस्त आहे. सरकारचे कोट्यवधी रुपये कायदा सुव्यवस्थेवर व्यय होत आहेत. हिंदु धर्मीय घाम गाळून मिळवलेल्या पैशातून कर भरतात. त्यातून विशिष्ट धर्माच्या लोकांसाठी हा पैसा पुष्कळ प्रमाणात व्यय होतो. खरे तर हा पैसा पाण्यात जातो. हा समाज देशाच्या विकासासाठी नगण्य योगदान देतो, या समाजाकडून नगण्य असा कर भरला जातो. आज या समाजाने स्वतःचा आडमुठेपणा सोडून सर्वांसोबत गुण्यागोविंदाने रहायचे ठरवले, तर भारत एक संपन्न आणि सुखी असा देश होईल.

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या साधनेने ‘हिंदु राष्ट्र स्थापने’चे कार्य सिद्धीस जाणार !

अशा दुष्प्रवृतीला आळा घालण्यासाठी सनातन संस्थेचे जीवापाड प्रयत्न चालू आहेत. कुठलेही कार्य सिद्धीस जायचे असेल, तर त्यामागे तपस्या लागते. ईश्वरी अवतार सुद्धा कुणाच्या माध्यमातून होत नसून त्याकरता पुष्कळ मोठे तप ऋषिमुनी करतात. त्या तपस्येचा परिपाक म्हणून अवतार होऊन कार्यसिद्धी होते. त्याचप्रमाणे ‘सनातन’ने घेतलेल्या ‘हिंदु राष्ट्र स्थापने’च्या कार्याच्या संकल्पासाठी निरनिराळे साधक आणि स्वत: सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हेसुद्धा साधना करत आहेत. साधना आणि कार्य यांचा मेळ निश्चितपणे कार्यसिद्धी करतो.

४. ‘सनातन संस्थे’च्या कार्याची जागतिक नोंद घेतली जाणे !

अनेक वर्षांपासून हिंदु धर्मावर होणार्‍या शस्त्रप्रहारावर अंकुश ठेवण्याचे काम ‘सनातन संस्था’ करत आहे. त्याची नोंद फ्रान्सच्या संसदेत घेण्यात आली. हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. फ्रान्स हा देश सुद्धा आज भारताप्रमाणेच कायदा सुव्यवस्थेच्या चिंतेत आहे, तो आज कदाचित् आपल्याकडे आशेने बघत आहे.

सनातन संस्थेच्या ‘हिंदु राष्ट्र स्थापने’च्या कार्याला यश येवो, ही श्रीचरणी मनःपूर्वक प्रार्थना !

– श्री. श्रीनिवास गोटे (वय ७५ वर्षे), प्रकाशक, त्रैमासिक ‘प्रज्ञालोक’, नागपूर. (२१.६.२०२४)