Pakistan Blasphemy : महंमद पैगंबर यांच्या अवमानावरून पाकिस्तानमध्ये लहान मुलाने केली एका शिया मुसलमानाची हत्या !

लाहोर (पाकिस्तान) – पाकमधील पंजाब प्रांतामध्ये २३ जून या दिवशी एका मुलाने नजीर हुसेन शाह या ५५ वर्षीय व्यक्तीवर महंमद पैगंबर यांचा अवमान केल्याचा आरोप करून त्याची हत्या केली. पंजाब प्रांतातील गुजरातमधील कुंजाह येथे ही घटना घडली. काही दिवसांपूर्वीच एका पर्यटकाला याच आरोपातून पोलीस ठाण्यात गोळ्या झाडून ठार मारून नंतर त्याला जाळण्यात आल्याची घटना पाकमध्ये घडली होती.

१. हत्या करणार्‍या मुलाचे वडील आणि काका हे नजीर याच्या विरोधात बोलत असतांना ते मुलाने ऐकले अन् त्याने घरातून चाकू घेऊन नजीरवर चाकूने अनेक वार केले. यात तो जागीच ठार झाला. यानंतर मुलगा तेथून पळून गेला.

२. मृत नजीर हुसेन शाह हा शिया मुसलमान होता. पाकमध्ये शिया मुसलमान अल्पसंख्यांक आहेत. त्यांच्यावर नेहमीच अत्याचार केले जातात; कारण पाकिस्तान हा सुन्नी मुसलमानबहुल देश आहे.

शिया आणि सुन्नी मुसलमान म्हणजे काय ?

वर्ष ६३२ मध्ये महंमद पैगंबर यांच्या मृत्यूनंतर इस्लामचा खलिफा म्हणून पैगंबर यांचा उत्तराधिकारी अबू बकर यांना मानणारे सुन्नी, तर अली इब्न अबी तालिब याला उत्तराधिकारी मानणारे शिया मुसलमान होत.

संपादकीय भूमिका 

मुसलमान जेथे अल्पसंख्यांक असतात तेथे ते बहुसंख्यांकांच्या विरोधात कारवाया करतात आणि जेथे ते बहुसंख्य असतात तेथे ते अल्पसंख्यांचा वंशसंहार करतात अन् जेथे केवळ मुसलमानच असतात तेथे ते एकमेकांची जात आणि पंथ यांवरून हिंसा करतात !