इस्लामाबाद (पाकिस्तान) – ए.एन्.आय. वृत्तसंस्थेनुसार पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाने नुकताच वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात पाकिस्तानमधील धार्मिक अल्पसंख्यांकांना भेडसावणार्या महत्त्वाच्या आव्हानांचा तपशील देण्यात आला आहे. या अहवालात देशातील धार्मिक स्वातंत्र्याच्या स्थितीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या अहवालात हिंदु आणि ख्रिस्ती तरुणी यांचे बलपूर्वक धर्मांतर करणे, अहमदिया मुसलमानांच्या मशिदींवरील आक्रमणे आणि ऑनलाईन ईशनिंदा (महंमद पैगंबर आणि कुराण यांचा अवमान) आरोपांशी संबंधित अटकेची वाढती प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. पाकिस्तानमधील धार्मिक असहिष्णुता दूर करण्यासाठी आणि मानवी हक्क राखण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता या अहवालात नमूद करण्यात आली आहे.
The condition of minorities in Pakistan is deplorable! – Pakistan Human Rights Commission
According to the 1941 census before the partition of India, Hindus constituted 14.6 percent of the population in West Pakistan (now #Pakistan).
This percentage has declined over the years… pic.twitter.com/jxH42KQwVL
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 25, 2024
पाकिस्तानात अहमदियांवर दडपशाही !
पाकिस्तानातील अल्पसंख्यांक, विशेषत: अहमदी मुसलमान पाकिस्तानमध्ये अतिशय असुरक्षित आहेत. धर्मांध अनेकदा या समुदायाला लक्ष्य करतात. अहमदी स्वतःला मुसलमान मानत असले, तरी वर्ष १९७४ मध्ये पाकिस्तानच्या संसदेने या समुदायाला ‘मुसलमानेतर’ घोषित केले आहे. अहमदींना केवळ स्वतःला मुसलमान म्हणवून घेण्यावरच नव्हे, तर इस्लामच्या काही पैलूंचे पालन करण्यासदेखील बंदी घालण्यात आली आहे. वर्ष १९५३ मधील लाहोर दंगलीत अहमदिया समुदायाचे २०० ते २ सहस्र लोक मारले गेल्याचे सांगितले जाते.
पाकमध्ये केवळ २ टक्के हिंदू !
पाकिस्तानमध्ये मुसलमानांनंतर हिंदु, हा सर्वांत मोठा धार्मिक समुदाय आहे. तथापि हिंदूंची लोकसंख्या पाकिस्तानच्या लोकसंख्येच्या केवळ २.१४ टक्के आहे (अनुमाने ४० लाख ४० सहस्र लोक). उमरकोट जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ५२.२ टक्के हिंदु रहिवासी आहेत, तर थरपारकर जिल्ह्यात सर्वाधिक ७ लाख १४ सहस्र ६९८ हिंदु आहेत. पाकिस्तानातील हिंदू प्रामुख्याने सिंधमध्ये आहेत, जिथे बहुतेक हिंदु वस्त्या आहेत.
भारताच्या फाळणीपूर्वी वर्ष १९४१ च्या जनगणनेनुसार, पश्चिम पाकिस्तानात (आताच्या पाकिस्तानात) हिंदूची लोकसंख्या १४.६ टक्के होती, तर पूर्व पाकिस्तानात (आताच्या बांगलादेशात) २८ टक्के होती. पाकिस्तानला ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पश्चिम पाकिस्तानमधील ४७ लाख हिंदू आणि शीख निर्वासित म्हणून भारतात आले. त्यानंतर पहिल्या जनगणनेत (वर्ष १९५१) हिंदूंची लोकसंख्या पश्चिम पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येच्या १.६ टक्के आणि पूर्व पाकिस्तानच्या २२ टक्के होती.
पाकिस्तानमध्ये इतर अल्पसंख्याकांसह हिंदूंविरुद्ध हिंसाचार आणि भेदभावाची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. कठोर ईशनिंदा कायद्यामुळे हिंदूंविरुद्ध हिंसाचार आणि अत्याचारांची प्रकरणेही समोर येत आहेत.
पाकमध्ये केवळ काही सहस्र शीख शेष !
वर्ष १९४१ मधील जनगणनेनुसार शीख लोकसंख्या अंदाजे १६ लाख ७० सहस्र होती. शीख विशेषतः पश्चिम पंजाबमध्ये केंद्रित होते. फाळणीच्या वेळी पाकिस्तानात झालेल्या भीषण दंगलींमुळे शिखांची मोठी लोकसंख्या पाकिस्तानचा पश्चिम पंजाब सोडून भारतात आली. पाकिस्तानमधील शिखांच्या लोकसंख्येविषयी वेगवेगळी मते आहेत. पाकिस्तान सरकारच्या राष्ट्रीय डेटाबेस आणि नोंदणी प्राधिकरणानुसार वर्ष २०१२ मध्ये पाकिस्तानमध्ये ६ सहस्र १४६ शीख नोंदणीकृत होते. ‘सेंटर फॉर शीख रिसोर्सेस अँड स्टडीज’च्या वर्ष २०१० च्या सर्वेक्षणानुसार पाकिस्तानमध्ये ५० सहस्र शीख आहेत.
‘यूएस स्टेट डिपार्टमेंट’सह इतर स्रोतांचा दावा आहे की, पाकिस्तानमध्ये शिखांची लोकसंख्या अनुमाने २० सहस्र आहे. इतर काही अंदाजानुसार ती २० ते ५० सहस्र असू शकते. पाकिस्तानातील इतर अल्पसंख्यांकांप्रमाणेच शिखांनाही भेदभाव आणि इतर आव्हानांचा सामना करावा लागतो.
संपादकीय भूमिकाही स्थिती पालटण्यासाठी प्रथम भारतात हिंदु राष्ट्र स्थापन करणे आवश्यक आहे ! |