१. सद्गुरु सत्यवान कदम यांनी शारीरिक त्रासावर नामजपादी उपाय करण्यास सांगणे
‘२४.२.२०२४ या दिवशी पहाटे चार वाजता मला चक्कर आली आणि माझ्या तोंडातून फेस येऊ लागला. कुटुंबियांनी मला आधुनिक वैद्यांकडे नेले. त्यांनी मला रुग्णालयात भरती करून घेतले. दुसर्या दिवशी औषधे आणि गोळ्या देऊन घरी पाठवले. गोळ्या घेतल्यावर माझा त्रास काही प्रमाणात न्यून झाला; परंतु ओठांना फोड येऊन जखम झाली. त्यामुळे मला काहीही खाता येत नव्हते. तेव्हा उत्तरदायी साधकांच्या माध्यमातून सद्गुरु सत्यवान कदम यांनी मला ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय । श्री हनुमते नमः । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप करायला सांगितला. त्याप्रमाणे मी नामजपाला आरंभ केला.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि सद्गुरु सत्यवान कदम रुग्णालयात समवेत असल्याचे जाणवणे अन् नामजप केल्यामुळे ओठांना आलेल्या फोडांचा त्रास वेगाने न्यून होऊन प्रकृती पूर्ण बरी होणे
मी पुन्हा आधुनिक वैद्यांकडे गेलो. त्या वेळी मला दोन दिवस रुग्णालयात रहावे लागले. मी रुग्णालयात गेलो, त्याच दिवशी सद्गुरु दादा भ्रमणभाषवर माझ्याशी बोलले. ते म्हणाले, ‘‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले तुमच्या समवेत आहेत. तुम्हाला कसलीच भीती नाही. तुम्ही नामजप करा.’’ त्यांचे बोलणे ऐकतांना माझी भावजागृती झाली आणि मला पुष्कळ आनंद झाला. खरोखरच ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि सद्गुरु दादा माझ्या समवेत आहेत’, असे मला जाणवले. सद्गुरु दादांनी सांगितलेला नामजप केल्यामुळे ओठांना आलेल्या फोडांचा त्रास वेगाने न्यून झाला. त्यामुळे मी पातळ पदार्थ पिऊ शकलो आणि चार दिवसांत माझी प्रकृती पूर्ण बरी झाली.
३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी आजारपणातही सेवा करण्याची प्रेरणा देणे
आजारी असतांना घराबाहेर पडून सेवा करता येणे शक्य नव्हते, तरीसुद्धा भ्रमणभाषवरून संपर्क करून विज्ञापनाच्या वसुलीची सेवा केली. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी मला आजारपणातही सेवा करण्याची प्रेरणा दिली आणि माझ्याकडून सेवा करून घेतली.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि सद्गुरु सत्यवानदादा यांच्या चरणी मी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– श्री. मंगेश होडावडेकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ५४ वर्षे), सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. (१०.४.२०२४)