१. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्या ठिकाणी शोधल्यावर एका मिनिटात धनादेश आणि रोख रक्कम मिळणे
‘१४.५.२०२४ या दिवशी एका धर्मप्रेमींनी पैसे अर्पण दिले होते. ते मी एका पाकिटात घालून उत्तरदायी साधकाला देण्यासाठी खोलीतील एका खणात ठेवले. त्यानंतर दोन दिवसांनी उत्तरदायी साधकांना देण्यासाठी त्या खणात पाहिले, तर धनादेश (चेक) आणि रोख रक्कम दोन्हीही ठेवलेल्या जागी मिळाले नाहीत. मी सर्व साधकांना याविषयी विचारले, तसेच सगळीकडे पुष्कळ शोधले, तरी ते मिळाले नाही. त्यामुळे मला ताण आला. त्यानंतर सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना यासंबंधी विचारले. तेव्हा सद्गुरु गाडगीळकाकांनी एका क्षणाचाही विलंब न करता ‘खोलीतील एका कोपर्यात उजव्या बाजूला असलेल्या ‘रॅक’मध्ये आहे’, असे सांगितले. सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितलेल्या ठिकाणी शोधल्यावर एका मिनिटात धनादेश आणि रोख रक्कम मिळाली.
२. नामपट्ट्यांचा हरवलेला खोका सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्या ठिकाणी शोधताच अन्य एका गठ्ठ्यासमवेत सापडणे
असाच प्रसंग ३ मासांपूर्वी घडला होता. सनातनच्या ग्रंथांच्या मुद्रणाची सेवा करणारे श्री. हरीश आचार्य यांनी एका मुद्रणालयात सनातन संस्थेच्या १० सहस्र ‘स्टिकर’च्या नामपट्ट्या छापल्या होत्या. ‘त्या नामपट्ट्यांचा खोका कामगारांनी कुठे ठेवला ?’, हे त्याला कळले नाही. त्यामुळे त्यांनी २ – ३ दिवस संपूर्ण मुद्रणालयात तो खोका शोधला, तरी खोका सापडला नाही. त्यानंतर सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना याविषयी सांगितले. त्यांनी लगेच सांगितले, ‘‘मुद्रणालयाच्या वरच्या बाजूला उजवीकडे आहे. तिथे शोधा.’’ त्याप्रमाणे शोधल्यावर ‘दुसर्या एका गठ्ठ्यासमवेत तोही खोका आहे’, असे लक्षात आले.
या दोन्ही प्रसंगांवरून सनातन संस्थेचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या ज्ञानाची प्रगल्भता लक्षात येते. असे अनेक सद्गुरु आणि संत देऊन कृपा केल्याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. मोहन गौडा, बेंगळुरू (३१.५.२०२४)
|