लोखंडी पत्र्याची शेड अंगावर पडून ७ मुले घायाळ !

ठाणे येथील फूटबॉलच्या पटांगणातील प्रकार !

पटांगणावर पडलेली लोखंडी पत्र्याची शेड

ठाणे – उपवन येथील गावंड बाग येथे २१ जूनच्या रात्री वार्‍याने उडून गेलेली लोखंडी पत्र्याची भलेमोठी शेड फूटबॉलच्या पटांगणात खेळणार्‍या ७ मुलांच्या अंगावर पडली. यात ती मुले घायाळ झाली आहेत. ५ मुलांच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून सर्वांना खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. आर्यन अय्यर, सिद्धांत रवासिया, अभिज्ञान डे, इथन गोंसालवीस, आयान खान आणि शुभान करपे अशी त्यांची नावे असून सर्वांचे वय १५ वर्षे आहे.