महाराष्ट्रातील भाजपची कार्यकारिणी कायम रहाणार ! – खासदार पियुष गोयल

पियुष गोयल

मुंबई – महाराष्ट्राच्या कोअर कमिटीची बैठक देहली येथे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमवेत पार पडली. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या त्यागपत्राचा प्रस्ताव फेटाळण्यात आला. महाराष्ट्रातील भाजपची कार्यकारिणी कायम रहाणार आहे, अशी माहिती भाजपचे खासदार पियुष गोयल यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. या वेळी देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते.

ते म्हणाले, ‘‘महायुती आणि मविआ यांच्यातील मतांमध्ये ०.३ टक्क्यांचीच तफावत आहे. आम्हाला कुठे मते अल्प पडली ?, या विषयावर चर्चा झाली. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या आधीच्या आमच्या रणनीतीवर चर्चा केली. त्यानुसार आम्ही लोकशाही विकास आघाडीतील घटक पक्षांसमवेत विधानसभेच्या चर्चा करू. भाजप पूर्ण ताकदीने विजयासाठी प्रयत्न करील.’’